Supreme court on election commission: मतदान आकडेवारीवर तातडीने सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाची सहमती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील मतदान संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत,’ अशी मागणी करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शविली. न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला माहिती देण्याचा आदेश दिला असून, यावर २४ मे रोजी सुनावणी होणार आहे.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना याबाबत आदेश दिले असून, या प्रकरणाच्या सुनावणीस सहमती दर्शवली. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेचे वकील प्रशांत भूषण यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.

Nagpur News : नागपूरमध्ये १५७ गावांना पुराचा धोका, नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी ‘या’ उपाययोजनांवर भर
त्यानुसार खंडपीठाने सायंकाळी साडेसहा वाजता सुनावणी घेऊन आयोगाला आदेश दिला. गेल्या आठवड्यात स्वयंसेवी संस्थेने आपल्या सन २०१९ च्या जनहित याचिकेत अंतरिम अर्ज दाखल करून निवडणूक आयोगाला सर्व मतदान केंद्रांच्या ‘फॉर्म १७ -सी’ भाग-१च्या स्कॅन केलेल्या प्रती मतदानानंतर लगेच अपलोड करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.

‘सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर ‘फॉर्म १७-सी’ भाग-१ मध्ये नोंदवलेल्या मतांच्या एकूण आकडेवारीत मतदान केंद्रनिहाय आकडेवारी देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत; तसेच लोकसभा निवडणुकीत एकूण संख्येने झालेल्या मतदानाच्या मतदारसंघनिहाय आकडेवारीचा सारांश द्यावा,’ अशी मागणी करण्यात आली आहे.

Source link

Association for Democratic Reformselectronic voting machineslok sabha elections 2024lok sabha elections resultssupreme court decisionsupreme court ordervoter privacyअसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सएडीआर अहवालनिवडणूक आयोग निर्णयमतदानाची आकडेवारीलोकसभा निवडणुक २०२४ बातमी
Comments (0)
Add Comment