जगातील सर्वात जास्त ब्राईट स्क्रीन मिळेल ‘या’ फोनमध्ये; डोळे दिपवणारा हँडसेट येतोय 22 मेला

Realme GT 6T स्मार्टफोन 22 मेला भारतीय बाजारात एंट्री घेणार आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट असेल. कंपनीनुसार, भारतात Snapdragon 7+ Gen 3 चिपसेटसह येणारा हा पहिला स्मार्टफोन असेल जो दमदार गेमिंग परफॉर्मन्स डिलिव्हर करू शकतो. फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी असेल, त्याचबरोबर 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की फोन फक्त 10 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. आता लाँच पूर्वीच कंपनीनं डिस्प्ले बाबत माहिती दिली आहे.

Realme GT 6T च्या लाँच पूर्वीच कंपनी एक-एक करून याचे स्पेसिफिकेशन्स सांगत आहे. अलीकडेच कंपनीनं बॅटरी, चार्जिंग, आणि प्रोसेसरची माहिती रिवील केली होती. आता फोनच्या डिस्प्ले पॅनलबद्दल माहिती समोर आली आहे. कंपनीनं डिस्प्ले 6000 निट्स पीक ब्राइटनेससह टीज केला आहे. आणि दावा केला आहे की ही स्मार्टफोनमधील आतापर्यंतची सर्वात ब्राईट स्क्रीन असेल. Amazon वरील मायक्रोसाइटवर याची माहिती देण्यात आली आहेत. सांगण्यात आलं आहे की फोनमध्ये HDR सपोर्ट देखील असेल. डिस्प्ले 8T LTPO टाइप आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

डिस्प्लेचे अन्य फीचर्स पाहता यात Corning Gorilla Glass Victus 2 प्रोटेक्शन देण्यात आला आहे. फोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 चिपसेटसह येईल. यात 5,500mAh ची बॅटरी मिळेल जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. टीजरमध्ये कंपनीनं सांगितलं आहे की फोन सर्वात मोठ्या कुलिंग चेंबरसह देखील येईल, हा ड्युअल व्हेपर चेंबर असेल. ज्याचा आकार 10014mm2 असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजे चांगल्या गेमिंग परफॉर्मन्ससह फोन जास्त हिट होणार नाही.

रिपोर्टनुसार, यात 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. फोन Android 14 OS आधारित Realme UI 5.0 कस्टम स्किनसह येऊ शकतो. यात मागे 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 प्रायमरी सेन्सर असेल. त्याचबरोबर OIS सपोर्ट देखील देण्यात आला आहे. दुसरी लेन्स 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर असेल. फ्रंटला सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. लीक्सनुसार, फोनची किंमत 30 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

Source link

realmerealme gt 6trealme gt 6t displayrealme smartphonesरियलमी जीटी ६टीरियलमी फोनरियलमी स्मार्टफोनस्वस्त फोन
Comments (0)
Add Comment