SWATI MALIWAL : स्वाती मालीवाल प्रकरण; अखेर विभव कुमार यांना दिल्ली पोलिसांकडून अटक

नवी दिल्ली – आपच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याचे पीए विभव कुमार यांना आज (१८मे) दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानावरून कुमारांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून विभव कुमार यांना गुरुवार (१६ मे) नोटीस बजावण्यात आली होती. आयोगाच्या आदेशानुसार त्यांन (१७ मे) सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु कुमार हजर राहिले नाहीत. आज अखेर विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
PM MODI : पंतप्रधान मोदींचे ‘ते’ दूत कोण ? ज्यांनी इस्रायलमध्ये जाऊन रमजानच्या महिन्यात गाझावरील बॉम्बफेक थांबवली

पोलिस मागच्या दाराने आत शिरले

आज १२ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा कार केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली. त्या कार मध्ये विभव कुमार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कारची तपासणी केली नाही, त्या कारच्या आधी आपचे खासदार राघव चढ्ढा यांची कार तपासण्यात आली. आणि त्यांना आत जाण्यासाठी १० मिनिटे लागली.

त्यानंतर १२.१० वाजता दिल्ली पोलिसचे उच्च अधिकारी केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या मागच्या दाराने आत पोहोचले. तेथे बिभव कुमार उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी लगेच कुमार यांना १२. ४५ वाजता अटक केली.
मद्यधोरण घोटाळ्यात केजरीवालांसह ‘आप’ही आरोपीच्या पिंजऱ्यात, ‘ईडी’ने आवळला कारवाईचा फास

स्वाती मालीवाल भाजपचा मोहरा

स्वाती मालीवाल या आपच्या खासदार असून स्वत:च्या पक्षानेच त्यांच्यावर आरोप केले आहेत. आपच्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत मालीवाल यांच्यावर आरोप केले आहेत. आतिशी म्हणाल्या की, ”स्वाती मालीवाल या भाजपचा मोहरा आहेत. त्यांना (१३ मे) रोजी केजरीवाल यांच्या घरी पाठवण्यात आले. केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप करणे हा मुख्य हेतू होता.”

Source link

crimenew delhiswati maliwalVibhav Kumarअरविंद केजरीवालआपदिल्ली पोलिसन्यायभाजपामारहाण
Comments (0)
Add Comment