पीएला अटक, अरविंद केजरीवाल आक्रमक, आपच्या नेत्यांना घेऊन भाजप कार्यालयात जाणार!

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्या (१९ मे) दुपारी १२ वाजता आमदार, खासदारांसह भाजप मुख्यालयात जाणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपने आपच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे ठरवले आहे. आधी मला तुरुंगात टाकले. आज माझ्या पीए ला तुरुंगात टाकलं आम्ही सर्वजण उद्या भाजप मुख्यालयात येत आहोत. ज्याला तुरुंगात टाकायचे आहे त्याला तुरुंगात टाका असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

व्हिडिओत स्वाती मालीवाल यांचा उल्लेख नाही –

केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. २ मिनिटे ३३ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये केजरीवाल यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी या व्हिडिओमध्ये त्यांचे पीए बिभव कुमार यांचा उल्लेख केला, पण पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्याविषयी एक शब्दही बोलले नाहीत. केजरीवाल व्हिडिओत म्हणाले की, ”भाजप आम्हाला चिरडून टाकू शकत नाही. त्यांनी जेल जेल चा खेळ खेळू नये. आम आदमी पार्टी ही एक कल्पना आहे. तुम्ही जितक्या नेत्यांना तुरुंगात टाकाल तितकी आमची वाढ होईल.”
JP Nadda: फिर मंदिर नही बनाएंगे? नड्डांनी भाजपची भूमिका मांडली; योगी आदित्यनाथांची विचित्र कोंडी

विभव कुमार यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर –

केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना आज (१८ मे) आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांनी तीज हजारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे.
मुलुंडमधील ठाकरे गट-भाजप राडा प्रकरणात पोलिसात गुन्हा, १५ गुंडांवर हल्ल्याचा आरोप, तिघे अटकेत

स्वाती मालीवाल यांच्यावर आपचा आरोप –

स्वाती मालीवाल या आपच्या खासदार असून स्वत:च्या पक्षानेच त्यांच्यावर आरोप केले आहेत. आपच्या नेत्या आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत मालीवाल यांच्यावर आरोप केले आहेत. आतिशी म्हणाल्या की, ”स्वाती मालीवाल या भाजपचा मोहरा आहेत. त्यांना (१३ मे) रोजी केजरीवाल यांच्या घरी पाठवण्यात आले. केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप करणे हा मुख्य हेतू होता.” परंतु केजरीवाल यांनी आज शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये स्वाती मालीवाल यांचे नाव घेण्याचे टाळले असून त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Source link

amit shaharvind kejariwalbjpdelhijailNarendra Modiआपभाजप मुख्यालयविभव कुमारस्वाती मालीवाल
Comments (0)
Add Comment