व्हॉट्सॲपवर नंबर बदलणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी काँटॅक्ट नंबर बदलला की त्याची माहिती सर्वांना द्यावी लागत होती, पण आता तसे नाही. आता जर तुम्ही जुना व्हॉट्सॲप नंबर बदलून नवीन केला तर त्याची सूचना आपोआप सर्व नंबर्सना पाठवली जाते. नंबर बदलणे सोपे आहे पण त्या फोटो, व्हिडिओ आणि मेसेजचे काय होईल जे आधीच्या व्हॉट्सॲप नंबरशी जोडलेले आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हॉट्सॲपमध्ये एक फीचर आहे ज्याच्या मदतीने जुन्या नंबरवरून चॅट्स सहजपणे नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात, मात्र याची माहिती फार कमी लोकांना आहे. तुम्ही तुमचा व्हॉट्सॲप नंबर बदलत असाल आणि जुना डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर हे फिचर तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
व्हॉट्सॲपवर नंबर कसा बदलायचा?
जर तुम्ही फोन बदलत नसाल तर काही अडचण नाही, पण जर तुम्ही नंबरसोबत मोबाईल बदलत असाल तर व्हॉट्सॲपवर नंबर बदलण्यापूर्वी तुमच्या डेटाचा लोकल बॅकअप नक्की घ्या.
- 1फोनमध्ये WhatsApp उघडा आणि सेटिंग्जमध्ये जा.
- आता “Account” वर क्लिक करा आणि “Change Number” या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता स्क्रीनवर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. यामध्ये चॅट, सेटिंग्ज आणि डेटा मायग्रेट करण्याबाबत प्रश्न विचारले जातील.
- आता “Next” वर क्लिक करा आणि जुना आणि नवीन नंबर टाका.
- आता तुम्हाला नंबर बदलण्याची सूचना तुमच्या सर्व संपर्कांना पाठवायची की नाही हे निवडायचे आहे.
- यासाठी All Contacts, Contacts I have chat with chat आणि Custom Option असे तीन ऑप्शन उपलब्ध असतील.
- तुमच्या आवडीनुसार कोणताही पर्याय निवडा आणि नंतर “Done” वर क्लिक करा.
नवीन फोनवर फोन नंबर कसा बदलावा
तुम्हाला नवीन फोनवर चॅट्स ट्रान्सफर करायचे असल्यास, तुम्हाला तुमच्या जुन्या फोनचा Google Drive वर बॅकअप घ्यावा लागेल. तुम्ही Google Drive वर बॅकअप न घेतल्यास, तुम्हाला तुमचा बॅकअप ट्रान्सफर करावा लागेल.
तुम्ही नाव फोन घेतल्यास
- तुमच्या नवीन फोनवर WhatsApp इंस्टॉल करा.
- तुमचा नवीन फोन नंबर नोंदवा.
- तुमचा बॅकअप इन्स्टॉल करा.