शुक्रवारपासून ही तीव्र लाट सुरू झाली असून, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे या लाटेचा प्रभाव सर्वाधिक दिसेल. याखेरीज मध्य भारत आणि पूर्व भारतातही उष्णतेची लाट पाच दिवस राहील, असेही विभागाने म्हटले आहे.
– हवामान विभागाचा इशारा
– दिल्लीसह पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान या भागांत उष्णतेची तीव्र लाट पाच दिवस राहील
– मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची लाट राहील
– या काळात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, जुनाट आजार असणारे यांची सर्वाधिक काळजी घ्यावी
– इतर भागांतील चित्र
– गोवा आणि पश्चिम बंगालमधील हिमालयाचा भाग येथे आर्द्रता वाढल्यामुळे लोकांना त्रास जाणवू शकतो
– उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम राजस्थान येथे दोन ते तीन दिवस रात्रीचे तापमान अधिक राहील
– महानगरांमध्ये रात्रीचे तापमान अधिक राहील
– अमेरिकी संस्थेचा इशारा
भारतातील ५४.३ कोटी लोकांना १८ ते २१ मे या काळात किमान एक दिवस तरी तीव्र उष्मा जाणवेल, असा अंदाज अमेरिकेतील क्लायमेट सेंट्रल या हवमानविषयक संशोधकांच्या समूहाने नुकताच वर्तवला होता.
यापूर्वीचे सर्वाधिक तापमान
‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन’ या वेबसाइटवरील माहितीनुसार, १९ मे २०१६ रोजी राजस्थानातील फालोदी येथे ५१ अंश तापमानाची नोंद झाली होती. हे देशातील सार्वकालिक सर्वोच्च तापमान मानले जाते.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडील नोंदीनुसार २०२३ हे गेल्या १२२ वर्षांतील दुसरे सर्वांत उष्ण वर्ष ठरले होते.