Aryan Khan Arrest Update: आर्यनकडे ड्रग्जचा साठा आणि मोठी रोकड; अ‍ॅरेस्ट रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

हायलाइट्स:

  • आर्यन खानकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज व रोकड सापडली.
  • ड्रग्ज खरेदी आणि विक्रीतही सहभाग असल्याचा आरोप.
  • एनसीबीच्या अ‍ॅरेस्ट रिपोर्टमधील तपशील आला समोर.

मुंबई: मुंबई ते गोवा क्रूझवरील ड्रग्ज पार्टीतून अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोकड सापडली आहे. याबाबतचा तपशील एनसीबीच्या अ‍ॅरेस्ट रिपोर्टमधून समोर आला आहे. हा ‘अ‍ॅरेस्ट मेमो’ आर्यन याने मान्य केला आहे. ( Aryan Khan Arrest Latest Updates )

वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरणी मोठी कारवाई; शाहरुखच्या मुलासह तीन जणांना अटक

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आठ जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्यातील तीन जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचा समावेश आहे. या तिघांनाही एनसीबीने मुंबईतील किला कोर्टात हजर केले असता त्यांना उद्यापर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. ड्रग्ज पुरवठादार आणि आर्यनमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट पुरावा म्हणून सादर करत ही मोठी साखळी असल्याची शक्यता एनसीबीकडून कोर्टात व्यक्त करण्यात आली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने अटकेतील तिघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी दिली. आता एनसीबीच्या अ‍ॅरेस्ट रिपोर्टमधील माहिती हाती आली असून त्यात आर्यनकडे आढळलेलं ड्रग्ज आणि रोकड याचा तपशील देण्यात आला आहे.

वाचा: शाहरुखच्या मुलासह ८ जणांना ताब्यात का घेतलं?; NCB प्रमुख म्हणाले…

आर्यनकडून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या (एस्कॅटसी) २२ पील्स व रोख १.३३ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ड्रग्ज सेवन करण्याबरोबरच ड्रग्ज खरेदी आणि विक्रीचा आरोपही आर्यनवर ठेवण्यात आला आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील झोनल अधिकारी विश्व विजय सिंह यांनी ही कारवाई केली असून आर्यनवर एनडीपीसी अ‍ॅक्ट १९८५ च्या कलम ८ सी, २० बी, २७ व ३५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील ग्रीन गेट येथील इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल येथे ही कारवाई करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. कारवाईचा तपशील नमूद असलेली प्रत आर्यनलाही देण्यात आली असून त्यावर अटकेचे कारण मला सांगण्यात आले आहे व मी ही माहिती मोबाइलवरून कुटुंबीयांना कळवल्याचे नमूद करत त्याखाली आर्यनने स्वाक्षरी केली आहे.

दरम्यान, हा तपशील समोर आल्यानंतर आर्यनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पार्टीला मला गेस्ट म्हणून बोलावले होते. मी तिथे पैसे देऊन गेलो नाही. ड्रग्ज खरेदी-विक्रीशीही माझा काही संबंध नाही, असा दावा आर्यनने आपल्या जबाबात केला होता. प्रत्यक्षात त्याच्याकडून मोठी रोख रक्कम आणि ड्रग्ज सापडल्याचे व ड्रग्ज खरेदी-विक्रीचे पुरावेही आढळल्याचे एनसीबीच्या रिमांड कॉपीत नमूद करण्यात आले आहे.

वाचा:मुंबई-गोवा क्रुझवरील पार्टीमध्ये प्रवेशासाठी होता हा ‘कोडवर्ड’, NCB चा मोठा खुलासा

Source link

aryan khan arrest latest updatesaryan khan arrestedaryan khan sent to ncb custodymumbai cruise rave party raid updatesrk son aryan khan arrestedअरबाज मर्चंटआर्यन खानड्रग्ज पार्टीमूनमून धामेचाशाहरुख खान
Comments (0)
Add Comment