लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २२७ धनकुबेर उमेदवार, जाणून घ्या संपूर्ण यादी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी (२० मे) मतदान होणार आहे. या टप्प्यात आठ राज्यांतील ४९ जागांवर मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी अनेक उमेदवार असे आहेत ज्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली कोट्यवधींची संपत्ती जाहीर केली आहे.

कोण आहेत धनवान उमेदवार?

पीयूष गोयल
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पीयूष गोयल यावेळी मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ११० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पियुष गोयल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील आहेत.
महाराष्ट्रात प्रचार थांबला, मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, १३ जागांवर २० मे रोजी मतदान, कुणामध्ये होणार लढत?
अनुराग शर्मा

उत्तर प्रदेशच्या झाशी लोकसभा मतदारसंघातून भाजपने अनुराग शर्मा यांना तिकीट दिले आहे. ते श्री बैद्यनाथ आयुर्वेद भवन प्रा. लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती २१२ कोटी रुपये आहे. त्यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य ९५ कोटी रुपये आहे, तर त्यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य ११६ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

निलेश भगवान सांबरे
नीलेश भगवान सांबरे हे महाराष्ट्रातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सांभारे यांच्याकडे ११६ कोटींची संपत्ती आहे. यामध्ये ३२.७ कोटी रुपयांच्या जंगम मालमत्ता आणि अंदाजे ८३.३ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.

सुरेश गोपीनाथ म्हात्रे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांना भिवंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे. त्यांच्याकडे १०७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, म्हात्रे यांच्यावरही ७५ कोटींचे दायित्व आहे.

कृष्णा नंद त्रिपाठी
झारखंडच्या चतरा मतदारसंघातून काँग्रेसने कृष्णा नंद त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी ७० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

कोणत्या पक्षात किती करोडपती?

पाचव्या टप्प्यात ६९५ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यापैकी २२७ उमेदवार कोट्यधीश आहेत. पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या प्रति उमेदवाराची सरासरी मालमत्ता ३.५६ कोटी रुपये आहे. समाजवादी पक्षाचे सर्व १० उमेदवार करोडपती आहेत. याशिवाय शिवसेनेचे ६ आणि राजदचे ४ उमेदवार करोडपती आहेत.

भाजपच्या ४० पैकी किमान ३६ उमेदवारांनी त्यांची कोट्यवधींची संपत्ती जाहीर केली आहे. काँग्रेसच्या १८ उमेदवारांपैकी १५ उमेदवारांची संपत्ती एक कोटींहून अधिक आहे. लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे (सोमवार) रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात ६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ४९ जागांवर मतदान होणार आहे.

Source link

Lok Sabha elections fifth phaseloksabha elections 2024Loksabha elections candidatesLoksabha elections candidates worthLoksabha elections newsलोकसभा निवडणूक उमेदवार संपत्तीलोकसभा निवडणूक पाचवा टप्पालोकसभा निवडणूक बातमी
Comments (0)
Add Comment