…तर सनातन धर्म ही तितकाच मजबूत होणार, अन्नामलाई स्पष्टच बोलले; राजकीय वातावरण पुन्हा तापणार?

नवी दिल्ली : लोकसभेच्या धामधुमीत देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवल्याचे पाहायला मिळाले. यातच भाजपाचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी एका सभेत ‘भाजपा पक्ष जितका मजबूत होणार, सनातन धर्म तितकाच मजबूत आणि प्रखर होणार.’ असे वक्तव्य केले आहे.

अन्नामलाई यांनी रविवारी दिल्लीतील एका जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी सनातन धर्माबद्दल वक्तव्य केले आहे. याआधी तामिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला मुळापासून नष्ट करण्याची गरज बोलून दाखवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. यातच आता अन्नामलाई यांनी सनातन धर्म अधिक मजबूत होणार असल्याची भाषा केली आहे.
Lok Sabha Elections 2024 : स्मृती इराणी, राजनाथ ते राहुल गांधी, वर्षा गायकवाड, अनिल देसाई; लक्षवेधी लढतींची संपूर्ण यादी
दरम्यान अन्नामलाई यांनी भाजपाने १० वर्षांत केलेल्या कामांचा परिपाठ जनतेसमोर मांडला आहे. ते म्हणाले, ‘गेल्या १० वर्षांत भारतात ११ कोटी शौचालये बांधली गेली आहेत. काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधी आवास योजना होती, पण घर कोणाला मिळत होते, हेच कळायला मार्ग नव्हता. परंतु जेव्हा पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान आवास योजना सुरु केल्यावर या अंतर्गत ४ करोड घर मिळालेले आम्ही पाहिले आहे. काँग्रेस एवढं मुलभूत हक्कांवर बोलते, पण ही तीच काँग्रेस आहे जीने १९७५ मध्ये मुलभूत हक्क आणि लोकशाहीची हत्या केली होती.’
भारताच्या निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात चुरशीची लढत; या उमेदवाराचा फक्त एका मताने विजय झाला होता
‘कालपर्यंत दिल्लीतील काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोलणारे केजरीवाल आता भ्रष्टाचार लपवण्यासाठी काँग्रेसला शरण गेले आहेत,’ हे खेदजनक असल्याचे म्हणत ‘ही इंडिया आघाडी नाहीतर भ्रष्टाचाराच्या राक्षसांची आघाडी आहे. आणि यावेळी दिल्लीतील सातही जागांवर आपला विजय सुनिश्चित करायचाय, मग २०२५ मध्ये आपल्याला भ्रष्टाचारी केजरीवालांना मुळापासून उखडून पुन्हा कमळ फुलवायचा आहे,’ असा अन्नामलाई यांनी अरविंद केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

Source link

annamalaibig statementbjp leaderbjp tamilnadu presidentnew delhisanatan dharmaअन्नामलाईभाजपा तमिळनाडू प्रदेशाध्यक्षभाजपा नेतेराजकीय वातावरणसनातन धर्म
Comments (0)
Add Comment