prajwal revanna: प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, अटक वॉरंट जारी

वृत्तसंस्था, बेंगळुरू : आमदार व खासदारांसाठीच्या विशेष न्यायालयाने हसनचे खासदार तसेच, जनता दलाचे (सेक्युलर) नेते प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात शनिवारी अटक वॉरंट काढले. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप असून, लोकसभा मतदानाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विदेशात पलायन केले आहे.

याप्रकरणी प्रज्वल यांच्यासह त्यांचे वडील, आमदार एच. डी. रेवण्णा हेही आरोपी असून त्यांच्यावर एका महिलेच्या अपहरणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात दिवस पोलिस कोठडीमध्ये काढल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी; प्रकरण काय?
प्रज्वल यांनी अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ कर्नाटकात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रज्वल यांच्यासह देवेगौडा यांचे पूर्ण कुटुंबच अडचणीत आले. प्रज्वल हे माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू असून, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुतणे आहेत. हसन मतदारसंघात लोकसभेचे मतदान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रज्वल हे विदेशात पळून गेले. त्यांच्याविरोधात इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. कर्नाटक सरकार एका विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Source link

arrest warrant issued against prajwal revannaprajwal revannaprajwal revanna obscence video casewoman harresment case
Comments (0)
Add Comment