Vaishakh Purnima 2024 : वैशाख पौर्णिमा कधी? चंद्राला अर्घ्य देताना या चुका करु नका

Buddha Purnima 2024 Shubh Yog :

हिंदू धर्मात पौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. यादिवशी भगवान विष्णू आणि चंद्र देवाची पूजा केली जाते. यंदा ही पौर्णिमा २३ मे ला साजरी होणार आहे. वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते.

ही तिथी सगळ्यात पवित्र तिथी मानली जाते. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती. बुद्ध पौर्णिमेची तिथी २२ मे ला संध्याकाळी ५.५७ मिनिटांनी सुरु होईल तर गुरुवारी २३ मे ला संध्याकाळी ६.४१ वाजता संपेल. उदयनतिथीनुसार २३ मे ला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल.
Tuesday Astrology : मंगळवारी हनुमानाला करा या गोष्टी दान, विवाहातील अडचणी होतील दूर
सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ०९. १५ मिनिटांनी सुरु होईल. तर अभिजीत मुहूर्त सकाळी ११. १ ते १२.४५ पर्यंत असेल. सायंकाळी ७.२२ पर्यंत बव करणाचा योग आहे. या दिवशी भगवान बुद्धांची उपासना केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते असे म्हटले जाते.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शुभ संयोग घडून आला आहे. या दिवशी गुरु-शुक्र-रवि वृषभ राशीत एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. तसेच गुरु- रविच्या संयोगामुळे आदित्ययोगही तयार झाला आहे. याशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही जुळून आलाय. जाणून घेऊया यादिवशी चंद्राला अर्घ्य देताना कोणत्या चुका टाळायला हव्या
Marriage Solution : वय वाढतंय, लग्न जुळत नाहीये? अडथळे येताय? ज्योतिषशास्त्रानुसार करा हे उपाय, मिळेल मनासारखा जोडीदार

  1. सगळ्यात आधी सकाळी उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करुन त्या पाण्याने स्नान करा.
  2. त्यानंतर तांब्यात चांदीची किंवा तांब्याची नाणी, अक्षता, गंध, पांढरी फुले, सुपारीची पाने, सुपारी आणि कच्चे दुध घाला.
  3. चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करा. विधीनुसार चंद्राची पूजा करा.
  4. अर्घ्य अर्पण करताना चुकूनही शूज किंवा चप्पल घालू नका. या दिवशी तामासिक गोष्टींपासून दूर राहा.
  5. अर्घ्य अर्पण करताना ओम श्रम श्रीम श्रौम सा: ओम टू द मून या मंत्राचा जप करा. यामुळे आर्थिक चणचण कमी होईल. कौटुंबिक जीवनातील समस्या संपतील. मानसित ताणही संपेल.
  6. कुंडलीतील चंद्र दूषित असेल तर आईसोबत सतत वाद होतात. त्यांचे मत आपल्याला पटत नाही. कौटुंबिक मतभेदांना सामोरे जावे लागते. या दिवशी भगवान शंकराचे स्मरण करा.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

buddha purnimabuddha purnima datebuddha purnima Shubh Yogbuddha purnima TithiVaishakh Purnima 2024बुद्ध पौर्णिमावैशाख पौर्णिमा
Comments (0)
Add Comment