AC, Cooler, पंख्याची पण गरज नाही, हा जॅकेट देईल सुपर कुलिंग

तापमान इतकं वाढलं आहे की घराबाहेर पडण्यापूर्वी हजार वेळा विचार करावा लागतो. कारण घराबाहेर कूलर-एसी देखील कामी येत नाहीत. परंतु आज आम्ही तुम्हाला ज्या जॅकेट बाबत सांगणार आहोत जो तुम्ही घालून कुठेही फिरू शकता. हा जॅकेट परिधान करून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एसी किंवा कूलरचा परिधान केला आहे. हा जॅकेट कसे करतो? याची किंमत किती आहे? आणि हा तुम्हाला कुठून विकत घेता येईल, याची महिती जाणून घेऊया.

Air Conditioner Jacket

जर तुम्ही तुमच्यासाठी एअर कंडीशनर जॅकेट घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता. तसे पाहता या जॅकेटची ओरिजनल किंमत 20,184 रुपये आहे परंतु तुम्ही हा 31 टक्के डिस्काउंटसह फक्त 13,920 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. प्लॅटफॉर्म तुम्हाला यावर बँक डिस्काउंट देखील देत आहे. हा जॅकेट तुम्ही नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता, ज्याचा मंथली ईएमआय फक्त 626 रुपये येऊ शकतो.

या जॅकेटचे फीचर्स पाहता या जॅकेटमध्ये 10000mAh ची यूएसबी बॅटरी मिळत आहे, तसेच यात तुम्हाला 2 फॅन आणि एक केबल मिळते. हा जॅकेट रोज 13 तासांपर्यंत तुम्हाला कूल ठेवू शकतो. हा वॉटरप्रूफ जॅकेट असून तुम्ही हा सहज परिधान करू शकता आणि कुठेही वापरू शकता.
एसीच्या हवेमुळे दुखत आहेत का हातपाय? ‘हे’ गॅजेट्स येतील कामी

brrf Wearable Fan

9 ब्लेड्स फॅन असलेला हा जॅकेट घातल्यावर तुम्हाला गर्मी जाणवणार नाही. हा जॅकेट स्लीव्ह लेस आहे. यात देखील 10000mAh ची बॅटरी मिळते. स्त्री-पुरुष दोन्ही जा जॅकेट घालू शकतात. हा जॅकेट खूप स्टाइलिश आहे आणि यात तुम्हाला कलर ऑप्शन मिळत आहेत. या जॅकेट मध्ये तुम्हाला 4 रनिंग स्पीड मोड्स मिळतात. जॅकेट 14 तास बॅटरी बॅकअप देऊ शकतो परंतु हा बॅकअप याच्या स्पीडवर अवलंबून आहे.

तसे पाहता कूलिंग जॅकेटची ओरिजनल किंमत 5,999 रुपये आहे परंतु हा तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून 20 टक्के डिस्काउंटसह फक्त 4,799 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

Source link

ac jacketCooling JacketWearable Fanएअर कंडिशनरएसीएसी जॅकेटवेअरएबल फॅन
Comments (0)
Add Comment