मतदानापूर्वी राहुल गांधींनी घेतले हनुमानाचे दर्शन; मतदारांशी साधला संवाद, मतदानाचे केले आवाहन

उत्तर प्रदेश : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायबरेलीत मतदान करण्यापूर्वी हनुमान भगवानाचे दर्शन घेतले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या रायबरेलीतूनच यावेळी राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज पाचव्या टप्प्यात रायबरेलीत मतदान पार पडत असताना ते पिंपळेश्वर हनुमान मंदिरात पोहोचले आणि प्रार्थना केली.

राहुल गांधी सकाळच्या सुमारास राजधानी दिल्लीतून लखनऊ विमानतळावर दाखल झाले आणि पायी प्रवास करत रायबरेली गाठले. यावेळी त्यांनी काही मतदान केंद्रांची तपासणी केली आणि मतदारांशी संवाद देखील साधला. गांधी घराण्यातील सोनिया गांधी यांनी आतापर्यंत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आता राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस आपला गड राखण्यात यश मिळवेल का?, हे पाहावे लागेल.
Lok Sabha Elections 2024 : स्मृती इराणी, राजनाथ ते राहुल गांधी, वर्षा गायकवाड, अनिल देसाई; लक्षवेधी लढतींची संपूर्ण यादी
उत्तरप्रदेशात पाचव्या टप्प्यात मोहनलाल गंज, लखनऊ, रायबरेली, अमेठी, जलौन, झांसी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशंबी, बाराबांकी, फैझाबाद, कैसरगंज आणि गोंदा या तेरा मतदारसंघांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडत आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून देखील निवडणूक लढत आहेत.

दरम्यान राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहत मतदारांना भारताच्या प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते लिहतात,

Source link

hanuman bhagwanloksbha electionraebareliRahul Gandhitook darshanwainadपिंपळेश्वर हनुमानमतदानरायबरेलीराहुल गांधीलोकसभा निवडणूकसोनिया गांधी
Comments (0)
Add Comment