स्मार्टवॉच घेताना या चुका करणे टाळा, नाहीतर चुकीच्या चॉइसमुळे तुमचे पैसे जातील वाया

जर तुम्हाला नवीन स्मार्टवॉच घ्यायचे असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात. स्मार्टवॉच केवळ त्याची डिजाईन पाहून खरेदी करू नये. अन्यथा तुमचे पैसे वाया जातील. स्मार्टवॉच खरेदी करताना 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात. यामध्ये स्मार्टवॉच ब्रँड, रिव्ह्यू, डिस्प्ले फीचर्स यांचा समावेश आहे. नवीन स्मार्टवॉच घेण्याचा निर्णय घाईत घेणे टाळावे. चला स्मार्टवॉच घेतांना होणाऱ्या नार्मल चुकांकडे एक नजर टाकूया.

ब्रँड व्हॅल्यूऐवजी फिचर्सवर केंद्रित करा लक्ष

स्मार्टवॉच खरेदी करताना लोकप्रिय ब्रँडच्या मागे धावू नये. युजर्सनी नेहमी त्यांच्या गरजेनुसार फिचर्स असलेली असलेली वॉच शोधायला हवी.

रिव्ह्यू न वाचता वॉच खरेदी करणे

रिव्ह्यू वाचल्याशिवाय स्मार्टवॉच खरेदी करू नका. स्मार्टवॉच खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही त्याचे रिव्ह्यू नीट वाचले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे प्रोडक्ट वापरण्याचे फायदे आणि तोटे कळू शकतील.

कनेक्टिव्हिटी

तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करत असाल, तर तुम्ही खरेदी करत असलेले स्मार्टवॉच सर्व प्रकारच्या स्मार्टफोनला कनेक्ट होते की नाही याकडे नेहमी लक्ष दिले पाहिजे. तुमच्या आवडीचे घड्याळ तुमच्या फोनसोबत काम करेल की नाही हे आधीच तपासा.

बॅटरी लाइफकडे दुर्लक्ष करण

काही स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ खूपच कमी असते. अशा परिस्थितीत, तुमच्या गरजेनुसार स्मार्टवॉच निवडा, जे दीर्घ बॅटरी लाइफ देते.

ऑफर्समुळे स्वस्त वॉच खरेदी करणे

ऑफर्समुळे स्वस्त स्मार्टवॉच खरेदी करू नका. स्वस्त स्मार्टवॉचमध्ये फिचर्स आणि त्याची क्वालिटी चांगली नसते. नेहमी योग्य किमतीत विश्वसनीय ब्रँडचे स्मार्टवॉच खरेदी केले पाहिजे.

सर्वप्रथम तुमचा फोन आणि त्याच्या ऑपरेटिंग सिस्टमनुसार स्मार्टवॉच निवडणे आवश्यक आहे. असे होऊ शकते की तुम्ही स्मार्टवॉच खरेदी केले आणि ते तुमच्या फोनला सपोर्ट करत नाही. त्यामुळे, खरेदी करण्यापूर्वी, तुमचे स्मार्टवॉच Android आणि iOS च्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करते याबद्दल ठोस माहिती मिळवणे चांगले आहे. तथापि, ऍपल वगळता, बहुतेक स्मार्टवॉचेस Android आणि iOS दोन्हीला सपोर्ट करतात.

Source link

buying guidehow to choose smartwatchsmartwatchsmartwatch featurestips for choosing the right-martwatch
Comments (0)
Add Comment