ARVIND KEJARIWAL AND NARENDRA MODI : केजरीवाल यांच्या हत्येचा कट? मोदींच्या सांगण्यावरून दिल्ली मेट्रोमध्ये लिहिल्या धमक्या, आपचा भाजपवर आरोप

नवी दिल्ली : आपच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणामुळे सध्या दिल्लीत राजकीय युद्ध सुरू आहे. अशातच एक नवीन प्रकरण समोर आले असून दिल्ली मेट्रोमध्ये अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे आरोप आम आदमी पार्टीने सोशल मीडिया पोस्टद्वारे केले आहेत.

नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून दिल्या धमक्या

या प्रकरणावरुन आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी आणि खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच या दोन्ही नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून राजीव चौक, पटेल नगर मेट्रो स्टेशनवर धमकी लिहिली आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झाले तर त्याला थेट भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार असतील.”
Amit Shah: अमित शहांनी स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाला फटकारले; रोड शोमध्ये गृहमंत्री का संतापले?

आतिशी यांनी फोटोकॉपी दाखवल्या

केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याचे आपच्या नेत्या आतिशी यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर धमकी बाबतच्या फोटोकॉपी देखील मीडियाला दाखवल्या आहेत.
Sharad Pawar: ‘इंडिया’ कसा निवडणार PMपदाचा चेहरा? पवारांनी सांगितला ‘देसाई’ फॉर्म्युला, मोदींना उत्तर

मोदी केजरीवालांना घाबरतात

केजरीवाल यांना केलेल्या अटकेवरून आपच्या नेत्या आतिशी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे त्या म्हणाल्या की, ”भाजप आणि नरेंद्र मोदी हे अरविंद केजरीवाल यांना घाबरतात. निवडणुकीच्या मैदानात ते केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला तोंड देऊ शकत नाहीत हे या लोकांना माहीत आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्यावर एकामागून एक हल्ला करण्याचे डावपेच आखले आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच २१ मार्च रोजी केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात तुरुंगात पाठवण्यात आले.”

Source link

aapattackbjpPoliticssocial mediaअरविंद केजरीवालधमकीनरेंद्र मोदीनवी दिल्लीमेट्रो
Comments (0)
Add Comment