Vastu Tips: सूर्यास्तानंतर या चुका करु नका, अन्यथा व्हाल कंगाल! जाणून घ्या वास्तुशास्त्रातील नियम

Avoid These Mistake After Sunset :

ज्योतिषशास्त्रानुसार दिवसभरातील प्रत्येक वेळ आपल्यासाठी शुभ अशुभ परिणाम देत असते. हिंदू धर्म हा उपासनेसाठी आणि श्रद्धेसाठी ओळखला जातो. यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे. ज्याचे पालन करणे गरजेचे आहे. ज्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो.

आपल्यापैकी अनेकांना सूर्यास्त हा अधिक आवडतो. सायंकाळी त्याच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यास्त पाहाणे जितके डोळ्यांना अल्हादायक वाटते. परंतु, संध्याकाळच्या वेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो लावणं शुभ की, अशुभ? वाचा एका क्लिकवर
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही काम करणे टाळायला हवे. असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांसोबत आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. जाणून घेऊया सूर्यास्तानंतर कोणत्या चुका टाळायला हव्या.

  1. सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नका, यामुळे कर्जाच्या समस्या वाढतात.
  2. सूर्यास्तानंतर कपडे धुणे टाळावे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. तसेच अनेक आजारांना देखील निमंत्रण मिळते.
  3. ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी ७ वाजता झोपणे अशुभ मानले जाते. यावेळी देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतो. असे केल्याने घरातील सुख-शांती नाहीशी होते. आर्थिक चणचण कायम राहाते.
  4. सूर्यास्ताच्या वेळी खाणेपिणे टाळावे. असे केल्याने घरात दारिद्र्य येते.
  5. सूर्यास्तानंतर पैशांचे व्यवहार करणे टाळावे. यामुळे दिलेले पैसे पुन्हा आपल्याला मिळत नाही. तसेच सायंकाळच्या वेळी घरात झाडू मारु नये. असे केल्याने लक्ष्मी देवीचा कोप होतो.
  6. सूर्यास्तानंतर कोणाला दान-धर्म करु नका. दही दान केल्याने सुख-समृद्धी कमी होते. दहीचा संबंध हा शुक्र ग्रहाशी येतो. तसेच हा ग्रह प्रेम आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो.
  7. सायंकाळच्या वेळी कांदा आणि लसूण दान करु नका. हे दोन्ही केतू ग्रहाशी संबंधित आहेत. या गोष्टी संध्याकाळी कुणालाही दिल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  8. जेवल्यानंतर खरकटी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका. यामुळे घरातून लक्ष्मी देवी निघून जाते. तसेच यशाच्या मार्गात अडचणी येतात. आर्थिक चणचण भासते. अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Astro TipsastrologyVastu RulesVastu TipsVastu Tips For SuccessVastu Tips For Wealthवास्तु टीप्सवास्तुचे नियमवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment