iQOO Pad2 कधी होईल लाँच?
iQOO Pad2 सीरीज चीनमध्ये 31 मे रोजी लाँच होत आहे. या सीरिजच्या दोन्ही टॅब्लेटबाबत टीझर रिलीज करण्यात आला आहे. टॅब्लेटची लॉन्च तारीख कंपनीने सादर केलेल्या टीझरमध्ये दिसत आहे.
iQOO Pad2 मालिका गेल्या वर्षीच्या iQOO पॅडचा सक्सेसर म्हणून प्एंट्री करत आहे. कंपनीने लॉन्च होण्यापूर्वीच टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.
iQOO Pad2 सिरीज कोणत्या फिचर्ससह येईल?
iQOO Pad2 सीरीजबाबत, कंपनीने कंफर्म केले आहे की Pad2 टॅबलेट 12.1 इंच 144Hz स्क्रीनसह आणला जात आहे.
नवीन टॅबलेट Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह आणला जात आहे. टॅबलेटच्या बॅटरीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, Pad2 10,000mAh बॅटरीसह आणला जाईल .
रिपोर्ट्सनुसार, नवीन टॅबलेट 8MP रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरासह आणला जाऊ शकतो. याशिवाय, नवीन टॅब्लेट 44W फास्ट चार्जिंग फिचरसह एंट्री करू शकतात. त्याच वेळी, कंपनी 3.1K 144Hz स्क्रीनसह Pad2 Pro आणत आहे. हा टॅबलेट Dimensity 9300+ चिपसेट सह आणला जाऊ शकतो.
हा टॅबलेट 11500mAh बॅटरीसह सादर केला जात आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, नवीन टॅबलेट 13MP रियर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरासह आणला जाऊ शकतो. टॅबलेट 66W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो.
हे टॅब 66 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. टॅबमध्ये USB-C पोर्ट प्रदान केला जाईल, जो USB 3.2 स्टँडर्सला सपोर्ट करेल. असा अंदाज वर्तवला जात आहे की iQoo Pad 2 Pro मध्ये Vivo Pad 3 Pro सारखीच फिचर्स असतील. दोघांमधील फरक फक्त प्रोसेसरचा असू शकतो. याशिवाय तुम्हाला दमदार आवाजासाठी यामध्ये 8 स्पीकर दिले जातील. हा टॅब Android 14 OS वर बेस्ड OriginOS 4.0 वर काम करेल.