Amazfit चे नवीन स्मार्टवॉच Amazfit BIP 5 Unity भारतात लॉन्च करण्यात आले आहे. याचा डिस्प्ले 1.91 इंच इतका मोठा आहे. घड्याळात 120 पेक्षा जास्त वॉच फेस देण्यात आले आहेत. तसेच,यात तुम्हाला 12 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. घड्याळ फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
Amazfit स्मार्टवॉचची किंमत आणि उपलब्धता
Amazfit च्या नवीन स्मार्टवॉचची किंमत 6,999 रुपये आहे. हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन आणि ॲमेझफिट इंडिया स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते. हे घड्याळ राखाडी, चारकोल, गुलाबी रंगाच्या पर्यायांमध्ये येईल. घड्याळ स्टेनलेस स्टीलच्या फ्रेममध्ये येते. या घड्याळात हेल्थ सेंट्रिक ऑपरेटिंग सिस्टम Zep OS 3.0 समर्थित आहे.
Amazfit BIP 5 मध्ये विशेष काय?
Amazfit BIP 5 Unity केवळ स्टायलिश नाही तर एक प्रोफेशनल घड्याळ देखील आहे. हे घड्याळ IP68 रेटिंगसह येते. यामध्ये हार्ट रेट सेन्सरसह 3 एक्सिस मोशन सेन्सर आहे, जो सर्वसमावेशक हेल्थ ट्रॅकिंगसह येतो. यामध्ये स्मार्ट रेकग्नायजेशन फीचर देण्यात आले आहे.
हेल्थ फीचर्स
घड्याळात 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड प्रदान करण्यात आले आहेत. घड्याळाच्या मदतीने युजर्स त्यांच्या 24 तासांच्या हेल्थ ॲक्टिव्हिटी जसे की, हार्ट रेट, SpO2, स्ट्रेस मॉनिटर कंट्रोल करू शकतील. या घड्याळाच्या मदतीने युजर्स कॅलेंडर, रिमाइंडर, कॉल नोटिफिकेशन, रिमाइंडर आणि स्मार्टफोन ॲप नोटिफिकेशन यांसारख्या इतर फीचर्सचा आनंद घेऊ शकतील.
चार्जिंग टाईम
तुम्हाला घड्याळात जलद चार्जिंग फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे तुम्ही 120 मिनिटांत घड्याळ चार्ज करू शकता. तसेच, हे घड्याळ एका चार्जवर सुमारे 12 दिवस आरामात वापरले जाऊ शकते. असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.