मे-जूनच्या उन्हात, एसी असतानाही खोलीचे तापमान नार्मल होण्यास बराच वेळ लागतो. अशा परिस्थितीत, अनेक तंत्रज्ञान तज्ञांचे म्हणणे आहे की एसी आणि फॅनच्या योग्य कॉम्बिनेशनमुळे खोली लवकर थंड होते आणि त्यामुळे वीजही कमी लागते. आता या गोष्टीत कितपत तथ्य आहे, हे नंतर कळेल. मात्र जे एसीसोबत पंख्याचा वापर करतात, त्यांना उष्णतेपासून लवकर आराम मिळतो हे निश्चित आहे.
एसी आणि पंखा सोबत चालवल्यास वीज बिल कमी येते का?
उन्हाळ्यात एसीच्या वापरामुळे वीज बिल वाढू लागते. अशा परिस्थितीत, या मार्गांचा अवलंब करून, तुम्ही तुमच्या एसीची क्षमता वाढवू शकता आणि तुमचे वीज बिल देखील कमी करू शकता.
टेम्परेचर मेंटेन करणे
एसीचे टेम्परेचर नेहमी 24 अंशांवर ठेवा. 38 अंश तापमान असलेल्या भागात, 24 अंशांवर चांगला थंडावा निर्माण होतो. त्यामुळे वीज बिलही कमी होऊ शकते.
वेळेवर मेंटेनेस
खोली नीट थंड होण्यासाठी तुमच्या एसीचा वेळोवेळी मेंटेनेस करा. यामुळे कूलिंग सुधारेल आणि वीज बिल कमी होईल. ऊर्जेची बचत करण्यासाठी, AC टायमर नेहमी सेट केला गेला पाहिजे.
ACसोबत पंखा सुरू करण्याचे फायदे
काहीवेळा काही लोक एअर कंडिशनर (AC) चालवताना पंखा चालवत नाहीत किंवा खोली थंड झाल्यावर एसी बंद करून पंखा चालू करतात. लोकांना वाटते की पंखा गरम हवा सोडतो, ज्यामुळे खोली थंड होणार नाही. जेव्हा तुम्ही एसी सह पंखा चालवता तेव्हा पंखा संपूर्ण खोलीत थंड हवा योग्य प्रकारे पसरवतो. यामुळे तुम्हाला आरामदायक आणि थंड वाटेल.
जेव्हा तुम्ही एसी आणि पंखा एकत्र चालवत असाल तेव्हा खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित बंद करा, जेणेकरून बाहेरून गरम हवा आत येऊ शकणार नाही. अशा प्रकारे खोलीतील थंड हवा देखील बाहेर जाणार नाही. असे केल्याने तुमच्या ACवर जास्त लोड येणार नाही.