(कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी)
एरंडोल : तालुक्यातील कासोदा येथील भारती विद्या मंदिर शाळेच्या वतीने व संजीवन व्यसनमुक्ती केंद्र एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर या दरम्यान व्यसनमुक्ती जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असतो.
या अंतर्गत दि. ४ ऑक्टोंबर रोजी शाळेत “नशा करी दुर्दशा” हे पथनाट्य सादर करण्यात आले. सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली,समाज कल्याण अधिकारी जळगाव,संजीवन व्यसनमुक्ती केंद्र एरंडोल व भारती विद्या मंदिर कासोदा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ते आठ ऑक्टोंबर दरम्यान व्यसनमुक्ती जनजागरण सप्ताहांतर्गत पथनाट्य प्रमुख विनोद ढगे यांचे “नशा करी दुर्दशा” या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रमोद पाटील हे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राहुल मराठे, सागर शेलार,शैलेश मंत्री,
नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष रोहिदास पाटील,प्रकल्प संचालक राजेंद्र ठाकरे , सचिव संजय बागड,
तसेच भारती विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी मॅडम,कुलदीप पवार सर,एम.एस.पाटील सर, रविंद्र सोनवणे,नारायण क्षिरसागर सर व शाळेचे विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मराठे सर यांनी केले तर राजेंद्र ठाकरे सर यांनी आभार प्रदर्शन केले.
तर “बंधू भावाचा देशात वाहू दे वारा” या गाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…!