लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं, वाचा कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ लोकसभा मतदारसंघात एकूण ५७.५१ टक्के मतदान झाले आहे. यात सर्वात जास्त मतदान पश्चिम बंगाल मध्ये झाले. तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये ७३ टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात ४९.०१ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. याबरोबरच लडाखमध्ये ६७.१५ टक्के, झारखंडमध्ये ६३ टक्के आणि ओडिशामध्ये ६०.७२ टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात ५७.७९ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ५४.६७ टक्के, बिहारमध्ये ५२.६० टक्के मतदान झाले आहे.

महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सर्वात कमी ४९.०१ टक्के मतदान झाले असून दक्षिण मुंबईत ४५ टक्क्यांहून कमी मतदान झाले आहे. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी दावा केला की, मतदारांकडून मतदान केंद्रांबाहेरील सुविधांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत.

महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी
भिवंडी- ४८.८९ टक्के
धुळे- ४८.८१ टक्के
दिंडोरी- ५७.०६ टक्के
कल्याण – ४१.७० टक्के
मुंबई उत्तर – ४६.९१ टक्के
मुंबई उत्तर मध्य – ४७.३२ टक्के
मुंबई उत्तर पूर्व – ४८.६७ टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – ४९.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ४४.२२ टक्के
मुंबई दक्षिण मध्य- ४८.२६ टक्के
नाशिक – ५१.१६ टक्के
पालघर- ५४.३२ टक्के
ठाणे – ४५.३८ टक्के
पश्चिम बंगालमध्ये सात मतदारसंघात ७३% मतदान झाले.

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी
आरामबागमध्ये ७६.९० टक्के
बनगाव ७५.७३ टक्के,
उलुबेरिया ७४.५० टक्के
हुगळी ७४.१७ टक्के
श्रीरामपूर ७१.१८ टक्के
हावडा आणि बराकपूर ६८.८४ टक्के

बिहार

बिहारमध्ये पाच लोकसभा मतदारसंघात ५२.६० टक्के मतदान झाले. मुझफ्फरपूरमध्ये सर्वाधिक ५५.३० टक्के मतदान झाले आहे. तर दुसरीकडे मुझफ्फरपूरमधील दोन बूथ, एक गायघाट आणि दुसरे औरई विधानसभा मतदारसंघात, रस्त्यांच्या अनुपलब्धतेसह स्थानिक समस्यांमुळे मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता.

बिहारमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी
मुझफ्फरपूरमध्ये ५५.३० टक्के
हाजीपूरमध्ये ५३.८१ टक्के
सीतामढीमध्ये ५३.५० टक्के
सारणमध्ये ५०.४६ टक्के
मधुबनीमध्ये ५०.१२ टक्के

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये १४ मतदारसंघात ५७.७९ टक्के मतदान झाले. बाराबंकी येथे सर्वाधिक ६६.८९% मतदान झाले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी
बाराबंकी ६६.८९ टक्के
हमीरपूर ६०.३६ टक्के
बांदा ५९.४६% टक्के

झारखंड

झारखंडमध्ये चतरा, हजारीबाग आणि कोडरमा या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी ६३% मतदान झाले. तर पुलाची मागणी पूर्ण न केल्यामुळे हजारीबागमधील दोन मतदान केंद्रांवर लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

झारखंडमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी
हजारीबाग ६४.३२ टक्के
कोडरमा ६१.८६ टक्के
चतरा ६२.९६% टक्के

लडाख

लोकसभेच्या एकमेव जागेसाठी तीन उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी झालेल्या निवडणुकीत लडाखमध्ये ६७% पेक्षा जास्त मतदान झाले. लडाख, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठा संसदीय मतदारसंघ, लेह आणि कारगिल जिल्ह्यांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात ३९ वर्षांतील सर्वाधिक ५४.५७ टक्के मतदान झाले. कोणत्याही संसदीय निवडणुकीसाठी बारामुल्लामध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी १९८४ मध्ये ६१ टक्के होती.

Source link

lok sabha elections 2024Lok Sabha elections fifth phase newslok sabha elections newslok sabha elections votingLok Sabha elections voting percentageलोकसभा निवडणूक पाचवा टप्पा
Comments (0)
Add Comment