lakhimpur violence:’…अन्यथा महाराष्ट्र बंद करू’; काँग्रेस नेते नाना पटोले यांचा भाजपला इशारा

हायलाइट्स:

  • लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची भाजपवर टीका.
  • हिंसाचारातील दोषींवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र बंद करू- काँग्रेसचा इशारा.
  • उत्तर प्रदेशातील योगी सरकार हे आधुनिक जनरल डायर सरकार-काँग्रेसचा हल्लाबोल.

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारसह उत्तर प्रदेशातील सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशातील शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचे धोरणच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आखले असून शेतकरी संपवण्याचे पाप केले जात आहे. बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची ही संतापजनक घटना तालीबानी प्रवृत्तीचे निदर्शक असून शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. (congress leader nana patle criticizes bjp modi govt and yogi govt)

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व भाजप सरकारच्या विरोधात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात ‘असा’ साजरा होणार नवरात्रौत्सव; राज्य सरकारने केल्या नव्या गाइडलाइन जारी

शेतकरी हा या देशाचा आधार आहे. अन्नदाता आहे, त्यालाच संपवण्याचे काम भाजप करत आहे. लखीमखेरी येथे झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र बंद करु इशाराही पटोले यांनी दिला.

काँग्रेस नेत्या व सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमखेरी येथील पीडित शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांची अडवणूक केली, त्यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले आणि शेवटी बेकायदेशीर अटकही केली. या सर्व घटनांचा निषेध करुन प्रियंका गांधी यांना सोडा नाहीतर राज्यभर जेलभरो आंदोलन करु असेही पटोले म्हणाले. भाजपा सरकार सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करत असून महाराष्ट्रातही शेतकरी संकटात असताना मदत देण्यात दुजाभाव केला जात आहे. त्यावरही भाजपा राजकारण करत आहे. या सर्वांचा हिशोब भाजपाला द्यावा लागेल, असे पटोले म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद; केल्या महत्वाच्या सूचना

राज्यभर काँग्रेसने केला निषेध

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडणाऱ्या आधुनिक जनरल डायर असे योगी सरकारचे वर्णन करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे आंदोलन करण्यात आले. तर जळगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईच्या समुद्रात क्रूझमधील ड्रग पार्टीवर एनसीबीचा छापा; मोठ्या अभिनेत्याच्या मुलासह १० जण ताब्यात
तसेच लातूर, सोलापूरसह राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी भाजपा व उत्तर प्रदेश सरकारविरोधात आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा व उत्तर प्रदेशातील अजयसिंह बिष्ट सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा निषेधही करण्यात आला.

Source link

bjpCongresslakhimpur violenceनाना पटोलेभाजपविरोधी आंदोलनमोदी सरकारयोगी आदित्यनाथ सरकारलखीमपूर हिंसाचार
Comments (0)
Add Comment