विरोधक केवळ जातीयवादी नाहीत तर त्यांचे राजकारणही…, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर सणसणीत टीका

नवी दिल्ली : ‘विरोधक केवळ जातीयवादी नसून त्यांचे राजकारणही जातीवादी आणि व्होटबँकेच्या विचारांमध्ये गुरफटले आहेत. कोणी माझ्याबद्दल काहीही बोलोत, पण मी त्यांची पापं उघडी पाडल्याशिवाय राहणार नाही.’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे.

राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांनी त्यांच्यावर ‘जातीयवादी’ म्हणून केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘विरोधक केवळ जातीयवादी नसून त्यांचे राजकारणही जातीयवादी आणि व्होटबँकेच्या विचारांमध्ये गुरफटले आहे. अशाच प्रकारे त्यांचं राजकारण आहे. आणि मी आधी काहीवेळा विचार केला होता की, मी यापासून सावध राहायला पाहिजे. पण आता मी असं समजतो की, मला जातीयवाद्याचा लेबल लावोत अगर न लावोत, माझ्याबद्दल कोण काय टिप्पणी करतं याचा फरक पडत नाही, पण एक दिवस मी त्यांची पापं उघडी पाडल्याशिवाय राहणार नाही.’ अशा शब्दांत मोदींनी थेट इशारा देखील दिला आहे.
…तर सनातन धर्म ही तितकाच मजबूत होणार, अन्नामलाई स्पष्टच बोलले; राजकीय वातावरण पुन्हा तापणार?
पुढे ‘सबका साथ, सबका विकास’ हेच माझं उद्दिष्ट असल्याचे सांगत उदाहरणादाखल मोदी म्हणाले की, मी ग्रामीण भागातील १०० कुटुंबांना त्यांच्या हक्काचा लाभ दिला आहे. मग कोण कोणत्या समाजाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या नातेवाईकाचा कोणाशी संबंध आहे आणि कोणी कोणाला लाच दिली हे तुम्ही विचारू नका. माझी सामाजिक न्यायाची परिभाषा ही शासकीय कारभारात कोणताही भेदभाव न करणे अशीच आहे.

मोदी सरकारवर ‘लोकांचा विश्वास का आहे’ याचे कारण सांगत मोदी म्हणाले की, ‘मी जेव्हा १०० टक्के म्हणतो, तर तो खरा सामाजिक न्याय, खरी धर्मनिरपेक्षता. मग कोणालाही काही तक्रार असण्याचे कारण नाही.’ आणि लोकांना काही देण्याचा विषय येतो ‘तेव्हा मी याला दे आणि त्याला नको, असं मी कधीच करत नाही,’ अशी टिप्पणी देखील त्यांनी केली.
Lok Sabha Elections 2024 : स्मृती इराणी, राजनाथ ते राहुल गांधी, वर्षा गायकवाड, अनिल देसाई; लक्षवेधी लढतींची संपूर्ण यादी
‘विरोधक म्हणतात, जात बघूनच उद्योजकांना कॉन्ट्रक्ट दिले जातात. पण असं होऊच कसं शकतं? समजा एखाद्याला ब्रीज बांधायचा आहे, तेव्हा संबंधित व्यक्तींमधील कोणाकडे कौशल्य, अनुभव आणि संसाधने आहेत हे तपासावे लागते. जर ते जातीवर आधारित निवडले गेले, तर माझ्या देशाचं भविष्य काय असेल? अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना फटकारले आहे.

Source link

aapcommunalcommunal politicsCongressindian politicsloksabha electionncpOpponentsPM Modiकाँग्रेसजातीवादी राजकारणपंतप्रधान नरेंद्र मोदीलोकसभेची रणधुमाळीविरोधकांवर टीका
Comments (0)
Add Comment