इंडिया आघाडीची कामगिरी चांगली, देशात सरकार आम्हीच स्थापन करणार, मल्लिकार्जुन खर्गेंचा आत्मविश्वास दुणावला

नवी दिल्ली : ‘इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत आहे. महागाई, बेरोजगारी, भीतीचे वातावरण, लोकशाहीवर घाला हे मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला महत्वाचे ठरले. भाजपा आता पुन्हा सत्तेत येऊच शकत नाही, विरोधक देशात आपलं स्थिर सरकार स्थापन करणार आहेत,’ असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

देशभरात पाचव्या टप्प्यापर्यंतचे मतदान पार पडले आहे. यादरम्यान इंडिया आघाडी आणि एनडीएच्या धुरिणांनी सर्वत्र आपली ताकद लावलेली पाहायला मिळालं. भाजपा सत्तेत कायम राहण्यासाठी आगामी वर्षांतील विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांना साद घालत आहे तर इंडिया आघाडीतील पक्ष जनतेच्या प्रश्नांवर आणि मोदी सरकारच्या अपयशावर हल्ला चढवत मतदारांना आकर्षित करत आहेत. यातच काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीचंच देशात सरकार येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यंदाची निवडणूक परिवर्तनाची निवडणूक म्हणून इतिहासात नोंदवली जाणार, सचिन पायलट यांनी व्यक्त केला विश्वास
मल्लिकार्जुन खर्गे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत देशातील लोकसभा निवडणूकीच्या निकालावर भाष्य केले आहे. खर्गे म्हणाले, ‘२०१९ च्या तुलनेत ही निवडणूक इंडिया आघाडीसाठी चांगली होती, आम्हाला देशात चांगले बहुमत मिळेल. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की, भाजपाला हरवू आणि त्यांना सत्तेत येण्सापासून रोखू. जनताच सांगते की जनता ही निवडणूक लढण्यासाठी समोर येत आहे आणि आम्ही त्यांना मदत करत आहोत. त्यामुळे भाजपाचा ४०० पारचा दावा हा पूर्ण होणं अशक्य आहे. पंतप्रधान आपली प्रतिमा लोकांमध्ये बनून राहावी म्हणून असे फोल दावे करत आहेत.’
मी कधीही अल्पसंख्याकांविरोधात बोललो नाही, फक्त काँग्रेसच्या मतपेढीच्या राजकारणावर टीका केली : मोदी
‘लोक सांगतात ते महागाईने त्रस्त आहेत. आतापर्यंत ज्या युवा वर्गाचा कल भाजपाकडे होता, त्याच युवावर्गाची देखील भाजपाबद्दल तक्रार आहे. ते सांगतात की, आमच्याकडे जगण्यासाठी मुलभूत गरजांची देखील सोय नाही तर मग आम्ही काय करावं? तसेच दलित, आदिवासी, उपेक्षित जनतेमध्ये देखील भाजपा संविधान बदलणार असल्याची भीती आहे. जनतेने आता देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी बिगर-भाजप पक्ष आणण्याचा निर्धार केलेला आहे.’ असा विश्वास देखील मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला आहे.

Source link

bjpCongressindia allianceindian governmentloksabha electionMallikarjun KhargeNarendra ModiRahul Gandhiकाँग्रेसकाँग्रेस अध्यक्षनरेंद्र मोदीभाजपामल्लिकार्जुन खर्गेराहुल गांधीलोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment