असे दिसतात नुकतेच जन्मलेले तारे; नासाने शेयर केला फोटो

NASAने हबल स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने अंतराळातील एक विलक्षण दृश्य कैद केले आहे. अमेरिकन स्पेस एजन्सीने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तीन नव्याने जन्मलेले तारे दिसत आहेत. हे तिन्ही तारे चमकदार नेबुलामध्ये दिसत आहेत. नासाने याला HP Tau फॅमिली म्हटले आहे. ज्यामध्ये HP Tau, HP Tau G2 आणि HP Tau G3 हे तीन तारे दिसत आहेत.

या तिघांमध्ये HP Tau हा सर्वात तेजस्वी तारा आहे. हा तारा बेबी स्टार आहे. आपला सूर्य 4.6 अब्ज वर्षे जुना असल्याचे म्हटले जाते. HP Tau फक्त 1 कोटी वर्षे जुना असल्याचे म्हटले जात आहे. नासाने याला टी टॉरी स्टार म्हटले आहे ज्यामध्ये न्यूक्लियर फ्यूजन अद्याप सुरू झालेले नाही. पण आगामीकाळात तो आपल्या सूर्यासारखा तेजस्वी तारा बनण्याच्या मार्गावर आहे.

ताऱ्यांच्या भोवती दिसली डिस्क

हे तरुण तारे त्यांच्या जन्मानंतर मागे राहिलेल्या धूळ आणि गॅसच्या आवरणात (डिस्क) आढळले आहेत, NASAने आपल्या प्रेस रिलीजमध्ये नुकतेच असे म्हटले आहे. HP Tauला गुंडाळलेली डिस्क ही एक नेब्यूला आहे. HP Tauमधून एकसारखा प्रकाश बाहेर येत नाही, त्यात चढ-उतार होत असल्याचे दिसते. नव्याने जन्मलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत हे आढळते.

पृथ्वीपासून 550 प्रकाशवर्षे दूर

ताऱ्याभोवती फिरणारी ही डिस्क ताऱ्याचे संरक्षण करण्याचे काम करते. याशिवाय काही पदार्थही या डिस्कवर आदळतात. ताऱ्याच्या पृष्ठभागावर सनस्पॉट असणे हे देखील ताऱ्याच्या चमकदारपणाचे कारण असू शकते. HP Tau पृथ्वीपासून 550 प्रकाशवर्षे दूर आहे. ताऱ्याभोवती असलेली ही डिस्क स्वतः प्रकाश निर्माण करता नाही ही डिस्क एका मोठ्या खगोलीय आरशासारखे ती काम करत आहे. जवळच्या ताऱ्यांमधून प्रकाश रिफ्लेक्ट करण्याचे ते काम करते.

जसे की, धुके असतांना कारचे हेडलाईट सुरू केल्यास रिफ्लेक्शन होऊन धुक्याचे ढग समोर दिसू लागतात. याचप्रमाणे हे चित्र दिसते असते वर्णन नासाने केले आहे. नुकतेच स्पेस एजन्सी NASA त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी अंतराळाशी संबंधित घटनांची अपडेटेड फोटोज शेअर करत असते. यामध्ये अनेकदा हबल स्पेस टेलिस्कोपमधून टिपलेल्या फोटोजचाही समावेश होतो.

Source link

Nasanasa captures newborn starsnasa hubble telescopeNasa Newsstars hp tau family
Comments (0)
Add Comment