आजचे पंचांग 21 मे 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति वैशाख ३१, शक संवत १९४६, वैशाख शुक्ल, त्रयोदशी, मंगळवार,विक्रम संवत २०८१ सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे ०८, जिल्काद १२, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २१ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत.

त्रयोदशी तिथी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, चित्रा नक्षत्र ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ, तैतिल करण सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र तुला राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-०४
  • सूर्यास्त: सायं. ७-०७
  • चंद्रोदय: सायं. ५-१८
  • चंद्रास्त: पहाटे ४-१४
  • पूर्ण भरती: सकाळी १०-५२ पाण्याची उंची ३.९६ मीटर, रात्री १०-४४ पाण्याची उंची ३.७० मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-१४ पाण्याची उंची ०.९७ मीटर , सायं. ४-४१ पाण्याची उंची १.९५ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५ मिनिटे ते ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ११ मिनिटांपासून ते ९ वाजून ६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सकाळी ११ वाजून १६ मिनिटांपासून ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय – हनुमान मंदिरात नारळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

21 may 2024marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment