Vastushashtra Rules:
हिंदू धर्मात प्रत्येक देवतेला विशेष असे महत्त्व आहे. जर तुमच्या देवघरात बाळ गोपाळाचा फोटो किंवा मूर्ती असेल तर काही नियमांचे पालन करणे जास्त गरजेचे आहे.
बाळ गोपाळाला श्रीकृष्णाचा अवतार म्हणून ओळखले जाते. त्यांची सेवा केल्याने पुण्य लाभते. असे म्हटले जाते, ज्याप्रमाणे आपण आपल्या लहान बाळाचा सांभाळ करतो त्याप्रमाणे बाळ गोपाळाची सेवा करावी. श्रीकृष्णाचे हे बाळरुप सुंदर आहे.
बाळ गोपाळची मूर्ती घरात ठेवत असाल तर ती नियमितपणे स्वच्छ करा. मूर्तीचे स्नान करताना शंखाचा वापर करा. धार्मिकतेनुसार शंखामध्ये देवी लक्ष्मी निवास करते असे म्हटले जाते. ते पाणी फेकून देण्याऐवजी तुळशीच्या रोपाला घालावे.
वास्तुशास्त्रानुसार बाळ गोपाळ घरात ठेवल्यास काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. तसेच ज्या खोलीमध्ये बाळ गोपाळ ठेवत असाल त्या ठिकाणी कोणत्या वस्तू ठेवू नये हे जाणून घेऊया.
1. तुटलेली मूर्ती
घरात तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे तुटलेल्या मूर्ती देवघरात ठेवू नका. यामुळे आर्थिक चणचण भासते तसेच आरोग्यावर परिणाम होतो.
2. अस्वच्छ कपडे
देवघराच्या जवळ किंवा ज्या खोलीजवळ बाळ गोपाळांची मूर्ती ठेवली आहे. त्याठिकाणी घाणेरडे किंवा परिधान केलेले कपडे ठेवू नका. असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे धुतलेले किंवा घाण कपडे ठेवू नका.
3. रिकामे ताट ठेवू नका.
बाळ गोपाळाला नैवेद्य दाखवत असाल तर १० मिनिटांच्यावर ताट ठेवू नका. नंतर ते ताट दूषित होते असे म्हटले जाते. नैवेद्य फेकून देण्याऐवजी घरातील लहान मुलाला खाऊ घाला. ज्यामुळे बाळ गोपाळाची त्यांच्यावर विशेष कृपा राहाते.
4. सजावटीच्या वस्तू
बाळ गोपाळ ठेवलेल्या कोणत्याही खोलीत सजावटीचे सामान ठेवू नका. देवघराची रुम नेहमी स्वच्छ आणि हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही.
5. दगड किंवा रत्न
सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपण काही दगड किंवा रत्न घरात ठेवतो. असे करणे चुक आहे. देवघरातील कोणत्याही ठिकाणी अशा वस्तू ठेवू नका. त्याउलट तेथील वातावरण आनंददायी आणि सकारात्मक कसे राहिल याचा विचार करा.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.