मटा ग्राउंड रिपोर्ट: सोनेशुद्धता तपासणी मराठी माणसांच्या हाती; कार्यकुशलतेमुळे बावबाजारात महत्त्व

विजय महाले, कोलकाता : लखलखणारे सोने म्हणजे श्रीमंतांसाठी हौसचे मोल, तर सर्वसामान्यांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग. त्यामुळेच गेल्या काही वर्षात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट अशा विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये सोनेखरेदीचे महत्त्व कायम राहिलेले आहे. याच सोन्याच्या शुद्धता तपासणीचे कसब पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणूस सक्षमतेने पेलत आहे.

हावडा शहरातून हुगळी नदी ओलांडली की, कोलकाता शहरात प्रवेश होतो. ब्रिटिशकाळात उभारणी झालेल्या या शहरातील उंच बहुमजली इमारती आपल्याला मुंबई शहराची आठवण करून देतात. लॉर्ड डलहौसी यांनी आपल्या कार्यकाळात कोलकाता शहराला देशाची राजधानी म्हणून लागणारा सर्व प्रकारचा नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले. आता असलेली विविध शासकीय कार्यालये, भारतीय रिझर्व्ह बँकेसह पूर्वोत्तर रेल्वे विभागाचे कार्यालय ही सर्व आस्थापने त्यावेळी उभारलेल्या इमारतींमध्येच आहेत. पुढे सिलायदाहकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पेठा वसविण्यात आलेल्या आहेत. यात एका पेठेकडे जाणारा रस्ता कोणाचेही लक्ष वेधून घेईल, असाच आहे. त्याला म्हणतात बावबाजार. मोठमोठी होर्डिंग, त्यावर चकचकणारे दागिने परिधान केलेल्या नववधू भासाव्यात अशा तरुणींची छायाचित्रे या परिसराची श्रीमंती अधोरेखित करतात. बावबाजार, अर्थात सराफ बाजार. तेथे अगदी पाच बाय पाचच्या दुकानापासून अगदी दहा हजार स्क्वेअर फूटपर्यंतची सोने विक्रीची दालने दिसतात.

विश्वासार्हता असा ‘बाव’चा अर्थ. ज्या बाजारात विश्वास हाच मूळ आधार आहे, तेथे हाच विश्वास वृद्धिंगत करत सोन शुद्धता तपासण्याचे काम मराठी बांधव अनेक वर्षांपासून करीत आहेत. कोलकात्यात आलेल्या परप्रांतीयांनी बावबाजाराचा अपभ्रंश ‘बहुबाजार’ असा केल्याचे जाणवले. विवाहप्रसंगी कोणत्याही नववधूला दागिने खरेदीसाठी सर्वाधिक लुभावणारा हा भाग असल्याने त्याचे बावबाजारावरून ‘बहुबाजार’ असे नामकरण झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Aishwarya Rai: हातावरच्या प्लास्टरसह ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर, मदतीसाठी लेकही आली पुढे, आराध्याचा तो व्हिडिओ व्हायरल
नेमकी जबाबदारी काय?

बावबाजारात अनेक जण जुने सोने खरेदी करण्यासाठी येतात. यात अगदी दोनशे वर्षांपेक्षा जुने सोन्याचे दागिने असतात. त्यांची शुद्धता तपासणी करणारी असॉय सेंटर आहेत. तेथील भट्ट्यांमध्ये दागिने तापवून सोने नेमके किती कॅरेटचे, याची माहिती दिली जाते. ही जबाबदारी पेलणारे सगळे जण मराठीच आहेत. यात बहुतांश जण सातारा आणि सांगली जिल्ह्यातील मराठीभाषक आहेत.

मुली चांगले काम करतात, पण……

गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगालच्या, विशेषत: कोलकात्यातील सराफांनी सोने शुद्धता तपासणीत स्वावलंबी होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, त्यात त्यांना पूर्णत: यश मिळू शकलेले नाही. या व्यवसायात बंगालमधील मुली चांगले काम करीत आहेत. मात्र, विवाह झाल्यानंतर त्या निघून जातात. त्यामुळे आम्हाला पुन्हा नवीन माणसे घडवावी लागतात. त्यामुळे या बाजारात मराठी लोकांचे महत्त्व कायम राहिलेले आहे, असे विवेक कोकणे या तरुणाने सांगितले. केवळ कोलकाताच नव्हे, तर अगदी दुबईमध्येही सोने शुद्धता तपासणीच्या कामात मराठी भाषकच असतात, अशीही माहिती त्यांनी दिली.

Source link

gold purity checkkolkata newsLok Sabha Eletions 2024west bengal news
Comments (0)
Add Comment