फक्त 45 रुपये देऊन खरेदी करता येईल ‘हा’ फोन; अशी आहे Vivo ची ऑफर

Vivo Y200 Pro 5G भारतात लाँच झाला आहे. हा Y-सीरीजचा नवीन स्मार्टफोन आहे. यात सर्वात पातळ कर्व्ड 3D डिस्प्ले मिळतो. तसेच, हँडसेट मध्ये स्मूद फंक्शनिंगसाठी Snapdragon 695 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी मिळते. चला जाणून घेऊया याचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.

Vivo Y200 Pro 5G ची किंमत

विवो वाय 200 प्रो 5जी ची किंमत 24,999 रुपये आहे. या किंमतीत 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल. यावर 2500 रुपयांचा बँक डिस्काउंट आणि 6 महिन्यासाठी नो-कॉस्ट ईएमआय दिली जात आहे. विशेष म्हणेज हा फोन 45 रुपयांच्या डेली पेमेंट प्लॅन अंतर्गत देखील खरेदी करता येईल. फोन 15 दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
वहीप्रमाणे फोल्ड होणारा विवोचा नवा फोन येतोय भारतात; लाँचपूर्वीच Flipkart वर झाला लिस्ट

Vivo Y200 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

विवो वाय 200 प्रो 5जी मध्ये 6.78 इंचाचा 3डी कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. कंपनीनुसार, यात युजर्सना वॉटर-फॉल सारखा व्यूइंग एक्सपीरियंस मिळेल. यात पावरसाठी क्वॉलकॉमचा Snapdragon 695 प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच, हा मोबाइल फोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Vivo Y200 Pro 5G मध्ये फोटोग्राफीसाठी LED फ्लॅश लाइटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 16MP चा कॅमेरा आहे.

कंपनीनं Vivo Y200 Pro 5G मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडियो जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच, हँडसेट मध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक मिळतो.

Vivo X Fold 3 Pro येतोय

विवोनं आपला पहिला फोल्डेबल फोन Vivo X Fold 3 Pro भारतात येणार असल्याचं सांगितलं आहे. परंतु आतापर्यंत या डिवाइसच्या लाँच डेटची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे हा फोल्डेबल फोन गेल्यावर्षी मार्चमध्ये ग्लोबली लाँच करण्यात आला होता.

Source link

vivovivo smartphoney200 pro 5gy200 pro launchविवोविवो फोनविवो वाय२०० प्रो ५जीविवो स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment