तुमच्या बजेटमध्ये आला 12GB RAM असलेला गेमिंग फोन; चमकणाऱ्या लाइट्स देखील मिळणार

Infinix GT 20 Pro स्‍मार्टफोन मंगळवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन गेमिंगच्या चाहत्यांचा विचार करून यात सायबर मेचा डिजाइन आणि तीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत. GT 20 Pro मध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर आहे. यातील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 108 मेगापिक्‍सलचा मुख्य कॅमेरा आहे.

Infinix GT 20 Pro ची किंमत

Infinix GT 20 Pro ची किंमत बँक ऑफर्स सह 22,999 रुपये आहे. ज्यात 8GB RAM व 256GB स्‍टाेरेज मिळते. 12GB RAM व 256GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहेत. हा मेचा ब्‍लू, मेचा ऑरेंज, आणि मेचा सिल्‍वर कलर ऑप्‍शंस मध्ये येतो. 28 मेपासून Flipkart वर या फोनची विक्री सुरु होईल.
50MP च्या चार-चार कॅमेर्यांसह भारतात आला जबरदस्त फोन; इतकी आहे किंमत

Infinix GT 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Infinix GT 20 Pro मध्ये 6.78 इंचाचा full-HD+ (1,080×2,436 पिक्‍सल्‍स) LTPS अ‍ॅमोलेड डिस्‍प्‍ले देण्यात आला आहे. जो 60Hz, 120Hz आणि 144Hz अश्या रिफ्रेश रेटमध्ये स्विच करू शकतो. डिस्‍प्‍लेमध्ये 2304Hz PWM फ्रीक्वेन्सी आहे आणि हा 1,300 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो.

GT 20 Pro मध्ये आरजीबी मिनी-एलईडी देखील आहेत ज्या मागे C-शेप्‍ड रिंगमध्ये देण्यात आल्या आहेत. हा एलईडी इंटरफेस 8 कलर कॉम्बिनेशन आणि 4 लाइटिंग इफेक्‍ट देतो. हा स्‍मार्टफोन अँड्रॉइड 14 ओएसवर बेस्‍ड XOS 14 वर चालतो. कंपनी दोन प्रमुख अँड्रॉइड अपग्रेड आणि तीन वर्ष सिक्‍योरिटी अपडेट देणार आहे.

Infinix GT 20 Pro मध्ये मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 8200 अल्‍टीमेट प्रोसेसरची पावर आहे. त्याचबरोबर 8GB आणि 12GB LPDDR5X रॅम देण्यात आला आहे. सोबत पिक्‍सलवर्क्‍स X5 टर्बो गेमिंग चिप देखील आहे. फोनमध्ये एक्‍स बूस्‍ट गेमिंग मोड मिळतो, त्यामुळे बरेचसे गेम्‍स 90fps वर खेळता येतात.

Infinix GT 20 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह 108 मेगापिक्‍सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्‍सलचे इतर दोन सेन्सर आहेत. GT 20 Pro मध्ये 32 एमपी चा सेल्‍फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix GT 20 Pro मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 45W फास्‍ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी NFC, FM रेडियो, GPS, USB टाइप-C पोर्ट, OTG आणि ब्‍लूटूथचा सपोर्ट आहे. फोन ड्युअल स्‍पीकर्ससह येतो जे जेबीएलचे आहेत. इन-डिस्‍प्‍ले फ‍िंगरप्रिंट सेन्सरची सुविधा देखील या डिव्हाइस मध्ये देण्यात आली आहे.

Source link

budget gaming phonegaming phoneinfinix gt 20 proinfinix gt 20 pro launchinfinix gt 20 pro priceइन्फिनिक्स जीटी २० प्रोगेमिंग फोनबजेट गेमिंग फोन
Comments (0)
Add Comment