गुजरातच्या चहावाल्याला ITची ४९ कोटींची नोटिस; विषय खोल, समोर आला मोठा झोल; प्रकरण काय?

गांधीनगर: गुजरातमधील चहा विक्रेत्याला आयकर विभागानं नोटिस पाठवली आहे. त्याला ४९ कोटी रुपयांचा दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खेमराज दवे असं चहा विक्रेत्याचं नाव आहे. त्याच्या खात्यातून ३४ कोटी रुपयांचे अवैध व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेच आयकर विभागानं त्यांना नोटिस पाठवली आहे.

याआधीही दवेंना आयकर विभागानं दोन नोटिस बजावल्या होत्या. पण इंग्रजी भाषा येत नसल्यानं त्यांनी नोटिसींकडे दुर्लक्ष केलं. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना तिसरी नोटिस आली. ती घेऊन ते वकील सुरेश जोशी यांच्याकडे गेले. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
माझा जिल्हा, माझी जबाबदारी! कोणाला दिली सुट्टी, कोणी विमानाने आले; DM राबले, १००% मतदान झाले
२०१४-१५ आणि २०१५-१६ या कालावधीत अवैध आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी दंड लावण्यात आल्याची माहिती जोशींनी दवेंना दिली. दवेंनी त्यांच्या खात्यातून असे कोणतेही व्यवहार केले नव्हते. त्यामुळे त्यांनी पाटणमध्ये एका आयकर अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितलं. कोणीतरी तुमच्या नावानं खातं उघडून त्याचा वापर रक्कम फिरवण्यासाठी वापरल्याचं या
अधिकाऱ्यानं दवेंना सांगितलं.

खेमराज दवेंनी थोडी चौकशी केली. त्यानंतर त्यांना यामागचे सूत्रधार समजले. दोन भावांनी मिळून दवेंना गंडा घातला होता. विशेष म्हणजे त्या दोघांना दवे गेल्या १० वर्षांपासून चहा देत होते. त्यांनीच विश्वासघात करत दवेंची कागदपत्रं मिळवली. यानंतर दवेंनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Jayant Sinha: ना प्रचारात सहभाग, ना संघटनेत रस; पाचवा टप्पा संपताच भाजपकडून बड्या नेत्याला नोटिस
पोलीस एफआयआरनुसार, बनासकांठाच्या कांकरेजमध्ये राहणारे खेमराज दवे २०१४ पासून पाटणच्या बाजारात चहाचं दुकान चालवतात. तेव्हापासूनच त्यांच्या दुकानातून अल्पेश पटेल आणि विपुल पटेल यांच्या कार्यालयात चहा पाठवला जायचा. पटेल बंधू मूळचे मेहसाणाचे रहिवासी आहेत.

२०१४ मध्ये दवेंनी त्यांचं पॅन कार्ड बँक खात्याला जोडण्यासाठी अल्पेश यांच्याकडे मदत मागितली. दवेंनी त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ८ फोटो दिले. यानंतर अल्पेश पटेल हे दवेंच्या दुकानावर गेले. त्यांनी अनेक कागदपत्रांवर दवेंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. पोलिसांनी पटेल बंधूंची चौकशी केली आहे. पण त्यांना अद्याप तरी अटक झालेली नाही.

Source link

gujarat chaiwalaincome taxpoliceआयकर विभागगुजरात चहवालापोलीस
Comments (0)
Add Comment