भारतात या खास प्रकारचा फिटनेस बँड लॉन्च होण्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. धोनी आणि OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी ते अमेरिकेतून खरेदी केल्यानंतर ते वेअर केलेले दिसले आहे.
खरं तर, जेव्हा भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने विश्वचषकाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला, तेव्हा त्या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या हातावर बांधलेला हा बँड चर्चेचा विषय ठरला होता. परदेशात खरेदीसाठी उपलब्ध असलेले हे डिवाइस भारतात कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला होता.
आता WHOOPचे सीईओ विल अहमद यांनी एका पोस्टमध्ये कन्फर्म केले आहे की WHOOP आता भारतात उपलब्ध असेल. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, जगातील अनेक मोठे क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध खेळाडू या WHOOP चा वापर करत आहेत.
पोस्टमध्ये दिली लिंक, तिथून करता येईल खरेदी
सीईओ विल अहमद यांनी पोस्टमध्ये एक लिंक दिली आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही WHOOP मेंबरशिप खरेदी करू शकता. इंटरनॅशनल स्तरावरून तुम्ही हा बँड ऑर्डर करू शकता. हूपच्या वेबसाइटला भेट दिली असता तेथे दोन मेंबरशिप प्लॅन दिसले. २ वर्षांसाठी या प्लॅनची किंमत 399 अमेरिकन डॉलर इतकी आहे तर वर्षभराची किंमत 239 डॉलर्स इतकी आहे.
Hoopमध्ये वेगळे असे फिचर काय आहेत?
Hoop या बँडमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत आहेत, डिजाईन नाही तर या बँडमध्ये हेल्थ ट्रॅकिंग फिचर्सवर प्रामुख्याने काम करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही ॲथलिटची फर्स्ट चॉइस असते. हा फिटनेस बँड अचूक डेटा देतो, जो इतर कोणत्याही बँडमध्ये मिळणे थोडे कठीण आहे. यामध्ये कोणताही डिस्प्ले नाही आणि ते चार्ज करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे मनगटावर दिवसभर अडचणीशिवाय घालता येऊ शकतो.