Budh Gochar 2024 In Vrishabha Rashi :
पंचांगानुसार बुध ग्रहाचे दुसऱ्यांदा संक्रमण होणार आहे. यापूर्वी १० मे ला बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला होता. आता बुध ग्रह शुक्राच्या राशीत अर्थात वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.
३१ मे ला बुध ग्रहांचा राजकुमार वृषभ राशीत संक्रमण करेल. रात्री १२.२० मिनिटांनी बुधाचे संक्रमण होईल. १४ जूनपर्यंत बुध ग्रह वृषभ राशीत राहिल. ग्रहाच्या युतीनुसार कुंडलीमधील बुध ग्रहाची स्थिती मजबूत असेल तर त्या लोकांना जीवनातील सर्व प्रकारच्या सुख-सुविधा मिळतात.
बुध ग्रह हा बुद्धिमत्तेचा आणि वक्तृत्व प्रदान करतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अधिक मजबूत असतो त्या भूतकाळातील गोष्टींमध्ये अधिक पारंगत असतात. बुध ग्रहाचे वर्चस्व असणाऱ्या व्यक्ती व्यापारी आणि बोलण्यात अधिक चांगल्या असतात. कुंडलीतील बुध ग्रह चांगला असेल तर ही व्यक्ती दिसायला सुंदर आणि आकर्षक असते. बुध ग्रहाचे वृषभ राशीत संक्रमण झाल्यावर ५ राशींवर आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. जाणून घेऊया ५ राशींबद्दल सविस्तर
1. मेष
मेष राशीच्या लोकांनी या काळात खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. अन्यथा आर्थिक समस्या निर्माण होतील. पैशांचे व्यवस्थापन करा. ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.
2. मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाच्या संक्रमणादरम्यान सावध राहाणे गरजेचे आहे. या काळात पैसे अतिरिक्त खर्च होतील. ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागतील. तणावामुळे चिडचिड होऊ शकते.
3. सिंह
सिंह राशीच्या लोकांनी या काळात सावध राहायला हवे. बुध ग्रहाचे वृषभ राशीत संक्रमण झाल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. पैशाशी संबंधित निर्णय घेताना जपून घ्याल. वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा. आर्थिक चणचण भासू शकते.
4. तुळ
तुळ राशीच्या लोकांना या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. खर्च वाढू शकतो. यामुळे चिंतेत राहाल. हॉस्पिटलमध्ये खर्च करावा लागू शकतो. पैशाची बचत करण्याकडे अधिक लक्ष द्या.
5. वृश्चिक
वृषभ राशीत बुध ग्रहाचे संक्रमण झाल्यामुळे वृश्चिक राशींच्या जातकांना आर्थिक फटका बसेल. पैशांची फसवणूक होऊ शकते. उधारी घेताना आणि देताना विचार करा. या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळा. जीवनात समतोल राखा. प्रत्येक काम हुशारीने करा.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.