कॅमेरा सेंट्रिक फोन
शाओमीनं सादर केलेल्या टीजरवरून समजलं आहे की नवीन स्मार्टफोन दमदार कॅमेऱ्यासह येईल, ज्यात Leica द्वारे तयार करण्यात आलेला कॅमेरा मिळू शकतो. याआधी देखील कंपनीनं अनेक स्मार्टफोन आणले आहेत, ज्यात Leica ब्रँडिंग असलेला कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
आता पर्यंत लिक्सच्या माध्यमातून देखील माहिती मिळाली आहे की Xiaomi Civi 4 Pro भारतीय बाजारात येऊ शकतो. असं झाल्यास फोन 6.55 इंचाच्या OLED डिस्प्लेसह येईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.
शाओमी सिवी 4 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चे दोन सेन्सर आणि 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चे दोन कॅमेरे फ्रंटला मिळतील, जी या फोनची खासियत म्हणता येईल.
शाओमी सिवी 4 मध्ये 4700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच, हा मोबाइल फोन लेटेस्ट Android 14 वर चालतो.
संभाव्य किंमत
जर Xiaomi Civi 4 Pro भारतात लाँच झाला तर याची किंमत 35 ते 40 हजार दरम्यान ठेवली जाऊ शकते. हा डिवाइस अनेक कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.
Xiaomi 14
शाओमी 14 यावर्षी मार्चमध्ये लाँच करण्यात आला होता. याची किंमत 69,999 रुपयांपासून सुरु होते. स्पेसिफिकेशन पाहता, या स्मार्टफोन 6.36 इंचाच्या अॅमोलेड डिस्प्लेसह येतो. यात Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 4610mAh ची बॅटरी मिळते, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, डिव्हाइसमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.