स्टंट कोणाचा? शिक्षा कोणाला? तोंडावर जोरदार आघात, तरुण बुडाला; स्विमिंग पुलमध्ये जीव गेला

भोपाळ: सध्या उन्हाळा आहे. तापमान वाढल्यानं अनेक जण स्विमिंग पूल, वॉटर पार्काला जातात. स्विमिंग पूलमध्ये डुंबून उकाड्यापासून सुटका मिळावी असा हेतू अनेकांचा असतो. स्विमिंग पूलमध्ये उड्या मारताना अनेकांचा उत्साह शिगेला पोहोचतो. याच उत्साहाच्या भरात झालेल्या चुका स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवावर बेततात. याची प्रचिती देणारी घटना मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात घडली आहे.

सैलारा रोड परिसरातील डॉल्फिन स्विमिंग पूलमध्ये मित्रांसोबत गेलेल्या एका तरुणाचा स्टंट दरम्यान मृत्यू झाला. स्विमिंग करताना एका तरुणाची लाथ त्याला लागली. त्यानंतर तो पाण्यात बुडाला. स्विमिंग पूलमधून बाहेर काढून त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिकेत तिवारी असं मृत तरुणाचं नाव आहे. तो १८ वर्षांचा होता.
हातात हिरवा चुडा, अंगावर साडी, हात बांधलेले, रक्त सांडलेले; विद्यार्थ्याचा संशयास्पद अंत
स्विमिंग पूलच्या आवारात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यात अनिकेत स्विमिंग पुलच्या कठड्याजवळ येताना दिसतो. तितक्यात एक तरुण स्विमिंग पुलच्या बाहेरुन धावत येतो. कठड्यावर बसलेल्या तरुणाच्या वरुन तो पुलमध्ये झेपावतो. हा स्टंट करताना त्याचे दोन्ही पाय दोन वेगवेगळ्या दिशांना असतात. त्याच्या उजव्या पायाचा गुडघा अनिकेतच्या तोंडावर आपटतो.
गुजरातच्या GST मुख्य आयुक्तांनी साताऱ्यातील अख्खं गाव बळकावलं; तब्बल ६४० एकर जमीन खरेदी
चेहऱ्यावर जोरदार आघात झाल्यानं अनिकेतची शुद्ध हरपते. तो पाण्यात बुडतो. अनिकेत बाहेर याची वाट पाहिली जाते. पण तो काही बाहेर येत नाही. यात ६ मिनिटं निघून जातात. त्यानंतर आसपासचे तरुण अनिकेतला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करतात. या सगळ्या घडामोडी सुरु असताना लाईफगार्ड कुठेच दिसत नाही. अनिकेतला पाण्यात पडताना अनेक जण पाहतात. पण कोणीच लाईफ गार्डला हाक मारत नाही. लाईफ गार्ड अतिशय उशिरा धावले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. बेशुद्ध पडलेल्या अनिकेतनं जीव सोडला होता. या पुलमध्ये अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे.

Source link

Madhya Pradeshyouth drownedyouth drowned in swimming poolतरुणाचा बुडून मृत्यूमध्य प्रदेशस्विमिंग पुलमध्ये मृत्यू
Comments (0)
Add Comment