सहज संपणार या या फोनची मेमरी! 512GB स्टोरेजसह Realme GT 6T भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Realme GT 6T भारतात लाँच झाला आहे. हा GT लाइनअपचा नवीन डिवाइस आहे, जो 2 वर्षांनी भारतीय बाजारात आला आहे. याचे प्रमुख फीचर पाहता, स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमची Snapdragon 7+ Gen 3 चिप देण्यात आली आहे. यात ड्युअल LED लाइट मिळते. डिव्हाइसमध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. या नवीन हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि किंमत पुढे देण्यात आली आहे.

Realme GT 6Tचे स्पेसिफिकेशन्स

रियलमी जीटी 6टी मध्ये 6.78 इंचाचा LTPO डिस्प्ले आहे. याचे रिजोल्यूशन 120Hz आहे आणि यावर सुरक्षेसाठी Gorilla Glass Victus 2 आहे. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसर, 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. तसेच, हँडसेट मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते. तसेच, हा मोबाइल फोन अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

कंपनीनं रियलमी जीटी 6टी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात प्रायमरी सेन्सर 50MP चा आहे. त्याचबरोबर सेटअपमध्ये 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळते. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. रियलमी जीटी 6टी मध्ये 5500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि USB-C पोर्ट मिळतो. याचे वजन 190 ग्राम आहे.

Realme GT 6T ची किंमत

रियलमी जीटी 6टी 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB आणि 12GB+512GB स्टोरेज ऑप्शनसह बाजारात आला आहे, याची किंमत अनुक्रमे 24,999 रुपये, 26,999 रुपये, 29,999 रुपये आणि 33,999 रुपये आहे. याची विक्री अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) वर 29 मे पासून सुरु होईल. यावर एक्सचेंज ऑफरसह 2000 रुपयांची सूट देखील मिळेल.

Realme Buds Wireless 3 Neo

रियलमी जीटी 6टी व्यतिरिक्त Realme Buds Wireless 3 Neo देखील लाँच करण्यात आले आहेत. या नेकबँडमध्ये 13.4mm चे डायनॅमिक बास ड्रायव्हर देण्यात आले आहेत, त्यामुळे हेवी साउंड मिळतो. यात AI Environmental Noise Cancellation देखील मिळतो. तसेच, नेकबँडमध्ये गुगल फास्ट पेयरचा देखील सपोर्ट देण्यात आला आहे. याची किंमत 1,299 रुपये आहे, परंतु बँक ऑफरसह हे 1,199 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

Source link

realmerealme gt 6tRealme Mobileरियलमीरियलमी जीटी ६टीरियलमी मोबाइल
Comments (0)
Add Comment