सरकारने दिला मोठा दिलासा; Calling आणि SMS साठी 2 नवीन मोबाइल क्रमांकांची सीरीज केली जारी

सरकारने बँक मेसेज कॉलसह प्रमोशनल कॉल्स आणि मेसेजसाठी एक नवीन नंबर सीरीज जारी केली आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसांत मोबाईल युजर्सना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आतापर्यंत युजर्स प्रमोशनल कॉल आणि मेसेजमध्ये फरक करू शकत नव्हते. अशा परिस्थितीत सरकारने प्रमोशनल कॉल्स आणि मेसेजसाठी स्वतंत्र सीरिज दिली आहे. याशिवाय, मोबाईल युजर्सच्या सोयीसाठी नवीन नियम देखील बनवले जात आहेत, जे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत जारी केले जाऊ शकतात.

सरकारने जारी केली नवीन क्रमांकाची मालिका

दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI यांनी संयुक्तपणे एक नवीन मोबाइल नंबर मालिका (सीरीज) जारी केली आहे. या अंतर्गत प्रोमोशनल व्हॉईस कॉलिंग मेसेजेस 140 मोबाईल क्रमांकाच्या सीरीजमधून येतील, तर आर्थिक व्यवहार आणि सर्व्हिस व्हॉइस कॉल 160 क्रमांकाच्या सीरीजमधून येतील. येत्या काही दिवसांत, या नंबर सीरीज देशभरात दूरसंचार ऑपरेटर Jio, Airtel आणि Vodafone-Idea द्वारे लागू केल्या जातील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर या दोन मोबाइल नंबर सीरिजमधूनच प्रोमोशनल आणि बँकिंग मेसेज जारी केले जातील.यामुळे युजर्स जाहिरात आणि बँकिंग मेसेज कोणते हे ओळखण्यास सक्षम असतील. तसेच,यामुळे मोबाईल फसवणूक थांबण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

भारतात फिशिंग मेसेजेसचा पूर

अहवालानुसार, भारतात फेक आणि प्रोमोशनल कॉल व मेसेजेसचा पूर आला आहे. प्रत्येक मोबाईल युजरला दिवसाला सुमारे 20 ते 25 प्रमोशनल कॉल आणि मेसेज प्राप्त होतात. आकडेवारीनुसार, भारतातील मोबाईल युजर्सना महिन्याला 120 ते 150 दशलक्ष फिशिंग मेसेज पाठवले जातात. दर महिन्याला प्रत्येक 12 पैकी एक व्यक्ती फिशिंगला बळी पडतो. अंदाजे 3,00,000 लोक फसवणुकीला बळी पडतात, परंतु केवळ 35,000-45,000 लोक या घटनांची नोंद करतात.

आता व्हॉट्सॲपवरून नाही येणार फेक मेसेजेस

याशिवाय व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फेक कॉल आणि मेसेज करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. TRAI आणि DoT या दोघांनी मिळून OTT प्लॅटफॉर्मचे नियमन करण्याची योजना बनवली आहे. यासाठी ओटीटी प्लेयर्सकडून मसुदा तयार करण्यासाठी सूचना मागवल्या जातील. तसेच, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी, सरकार ब्लॉकचेन आधारित सोल्यूशन आणि डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) आणत आहे.

Source link

banking messagesfake callspromotional callsप्रचारात्मक कॉलबँकिंग संदेशबनावट कॉल
Comments (0)
Add Comment