इंस्टाग्रामवर बघीतली जाहिरात
रिपोर्टनुसार, संजयने (नाव बदलले आहे) 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यासाठी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला. ही घटना 10-11 मे रोजी घडली. संजयने इंस्टाग्रामवर आयपीएल तिकिटांबद्दल एक जाहिरात पाहिली होती. जाहिरातीत ‘ipl_2024_tickets__24’ असे लिहिले होते.
तिकीट देण्याची हमी
इन्स्टाग्रामवर दाखविण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये कंफर्म तिकिटे देण्याचा दावा करण्यात आला होता. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर, संजय यांनी पद्मा सिन्हा आणि विजय कुमार यांच्याशी बोलले ज्यांनी दावा केला की त्यांच्याकडे आयपीएल तिकिटे विकण्यासाठी अधिकृत फ्रेंचायझी आहे. यानंतर संजय यांच्याकडून आधारकार्ड व मोबाईल नंबर विचारून पैसे भरण्यास सांगण्यात आले.
आधी स्कॅमर्सने मागितले पैसे
पैसे भरल्यानंतर तिकीट पाठवले जाईल, असे आश्वासन त्यांना स्कॅमर्सने दिले. यानंतर संजयने तीन तिकिटांसाठी 7,900 रुपये दिले, परंतु त्यांना तिकिटे मिळाली नाहीत. त्यांनी स्कॅमर्सला फोन केला असता तिकीट मिळण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. कन्फर्म सीटसाठी तुम्हाला 67,000 रुपये द्यावे लागतील. यानंतर संजयने पैसे ट्रान्सफर केले मात्र तिकीट मिळाले नाही.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
तसेच, संजय यांनी दोन-तीन वेळा एकूण तीन लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र दोन दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
संजय यांची चूक कुठे झाली?
संपूर्ण प्रकरणाकडे नीट पाहिले तर दोष संजय यांचा आहे. स्कॅमर्सच्या सापळ्यात संजय स्वतः अडकले आहेत. प्रथम त्या सोशल मीडियाच्या जाहिरातीवर क्लिक करून त्याने पहिली चूक केली. दुसरी चूक पहिल्या पेमेंटनंतर तिकीट मिळाले नाही तरी त्यांनी पुन्हा पुन्हा पैसे सेंड केले.
IPLचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशावेळी तिकिटे बुक करतांना नेहमी अधिकृत वेबसाइट्सचा वापर केला पाहिजे. तिकिटे बुक करतांना तसेच पैसे पाठवतांना सावधगिरी बाळगली पाहिजे.