Pune Accident: आई वारंवार त्याच्या खोलीत जातेय, लेकाला शोधतेय! अनिशच्या कुटुंबाला दु:ख अनावर

पुणे: कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातात दोन कुटुंबांनी आपली मुलं गमावली आहेत. बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत असताना आपल्या आलिशान पोर्शे कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन इंजिनिअरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने त्यांचे कुटुंबीय दु:खसागरात बुडाले आहेत. आमच्या मुलांचा काय दोष होता सतत ते हाच प्रश्न विचारत आहेत. या घटनेने अनिशच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत कुटुंबात मोठी नाराजी आहे.

अनिश अवधिया हा मध्य प्रदेशातील शहडोल येथील राहणारा होता. तरुण मुलाच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरुन गेलं आहे. लेकाच्या मृत्यूची बातमी कळताच अनिशची आई आणि आजी बेशुद्ध पडल्या. त्या प्रत्येक क्षणी अनिशची आठवण काढत रडत आहेत.

शनिवारी रात्री उशिरा एका पार्टीतून परतत असताना जबलपूर येथील अनिश आणि त्याची मैत्रिण अश्विनी कोस्टा यांना विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे कारने धडक दिली. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणात सुरुवातील पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, नंतर पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पवयीनचे वडील विशाल अगरवालसह पब मालक आणि मॅनेजरला अटक केली.
आरोपीला शिक्षा होण्याची शक्यता खूप कमी; काय आहे नेमकी पळवाट? महत्त्वाचे ठरणार ‘ते’ १५ तास

अनिशने स्वतःसाठी एक खोली बांधली होती

अनिश महिन्याभरापूर्वीच घरी आला होता आणि त्याने आपल्या पगारातून घरात स्वत:साठी एक खोली केली होती. नंतर कंपनीतून फोन आला आणि तो परत पुण्याला गेला. मग अनिशच्या मृत्यूची बातमी आली. अनिशची खोली पाहून घरातील सदस्यांच्या डोळ्यातील आसवं थांबत नाहीयेत. अनिशची आई वारंवार त्या खोलीत जाऊन आपल्या मुलाला शोधत आहे, अशी माहिती अनिशचे नातेवाईक आत्माराम अवधिया यांनी दिली.

पोलिसांवर कुटुंबीयांचा रोष

अनिशचे कुटुंबीय पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संतापले आहेत. बिल्डरचा अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत २०० किमी/तास वेगाने कार चालवत होता, तरी साधी कलमं लावण्यात आली. हा अपघात नसून खून आहे, असं ते म्हणाले.

अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, १४ दिवस बाल निरीक्षण गृहात

पुण्याच्या कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातप्रकरणी न्यायालयाने अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करत त्याला १४ दिवस बाल निरीक्षण गृहात पाठवलं आहे. तर या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल याला पुणे न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Source link

Aneesh AwadhiyaAneesh Awadhiya MotherAshwini Koshtapune accident news updatePune Porsche AccidentPune Porsche Accident newsVedant AgarwalVishal Agarwal newsअनिश अवधियाअश्विनी कोस्टापुणे अपघातपुणे न्यूजपुणे बातमीविशाल अगरवालवेदांत अगरवाल
Comments (0)
Add Comment