Vastu Tips : खाण्यापिण्याचा बिझनेस सुरु करताय? दुकानात या दिशेला ठेवा पैशांचा गल्ला, धनात होईल वाढ!

Vastu Tips for Food shop :

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण स्ट्रीट फूड हमखास खातात. काहींना यामध्ये बिझनेस देखील करायचा असतो. यामध्ये अनेकदा चढ-उताराचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

वास्तुशास्त्रानुसार बिझनेसमध्ये अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे संपत्ती, समृद्धी आणि यश मिळते. घर बनवताना आपण मुख्य दिशा पाहातो. त्याचप्रमाणे बिझनेस करताना देखील त्याची योग्य दिशा पाहायला हवी.
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार हे नियम लक्षात ठेवा! आर्थिक चणचण होईल कमी
वास्तुशास्त्रानुसार जर खाण्यापिण्याचा बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर दुकानाचा पुढचा भाग मोठा आणि मागचा भाग लहान असायला हवा. असे दुकान वास्तुशास्त्रात अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे दुकानाचा भाग नेहमी रुंद असायला हवा. तसेच ज्यांच्या चार कोपऱ्यांची लांबी आणि रुंदी समान असेल अशा दुकानांना वास्तुशास्त्रात शुभ मानले जाते. अशा दुकानांमध्ये व्यवसाय केल्यास अधिक फायदा होतो.

1. वास्तूचे नियम लक्षात ठेवा

  • वास्तुशास्त्रानुसार दुकानाच्या प्रवेशद्वारासाठी पूर्व दिशा, उत्तर दिशा आणि उत्तर-पूर्व दिशा अतिशय शुभ मानली जाते.
  • वास्तुशास्त्रानुसार दुकानदाराने नेहमी पूर्व दिशेला बसावे. ज्यामुळे ग्राहकाला वस्तू देताना त्याचे तोंड उत्तरेकडे असायला हवे. असे केल्याने दुकानात सतत नफा मिळतो.
  • वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, दुकानाच्या सेल्समनचे तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे.
  • वास्तुशास्त्रानुसार दुकानाचे प्रवेशद्वार पश्चिम आणि दक्षिण दिशेला नसावे. यामुळे वास्तूदोष तयार होतो. ज्यामुळे नुकसान होऊ शकते.
  • वास्तुनुसार रिसेप्शन किंवा कॅश काउंटर पश्चिम दिशेला असायला हवे.
  • वास्तुशास्त्रानुसार हॉटेलचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि आकर्षक ठेवा. तसेच सकारात्मक ऊर्जा आकर्षित राहिल.

Vastu Tips : प्रेमात अपयश येते? जोडीदारासोबत सतत वाद होतात? वास्तुशास्त्रानुसार करा हे ५ उपाय, नात्यात वाढेल मधुरता

2. पैसे मिळवण्यासाठी हे उपाय करा

वास्तुनुसार व्यापारात सतत नुकसान होत असेल तर एका टोपलीत लाल कपड्यात बडीशेप बांधून ठेवा. ४३ दिवस तसेच ठेवा, त्यानंतर हा लाल कापड मंदिरात अर्पण करा. यामुळे पैशांची चणचण कमी होईल, तसेच व्यापारात फायदा होईल.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Vastu RulesVastu TipsVastu Tips For SuccessVastu Tips For Wealthवास्तु टीप्सवास्तुचे नियमवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment