अहमदनगर जिल्ह्यानं वाढवली राज्याची चिंता; आणखी ८ गावांमध्ये लॉकडाउन

हायलाइट्स:

  • अहमदनगर जिल्ह्यानं वाढवली राज्याची चिंता
  • आणखी ८ गावात करोनाचे निर्बंध
  • निर्बंध असलेल्या गावांची संख्या झाली ६९

अहमदनगर: जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये रविवारी लॉकडाउनचा आदेश दिल्यानंतर आता आणखी ८ गावांत नव्याने हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन केलेल्या गांवाची संख्या ६९ झाली आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणाहून याला विरोध होऊ लागला आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सरकार आणि प्रशासनावर आरोप करून दोन दिवसांत योग्य निकष लावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर पारनेर तालुक्यात व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. (Lockdown like restrictions in eight more villages in Ahmednagar)

राज्यात करोना रुग्णांचे आकडे कमी होत असताना नगर जिल्ह्यात मात्र दिलासा मिळण्यास तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने कठोर उपाय हाती घेतले आहेत. पहिल्या टप्प्यात ६१ गावांत लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतर नेवासा तालुक्यातील चांदा, पारनेरमधील निघोज, वाडेगव्हाण, टाकळी ढोकेश्वर, अळकुटी, संगमनेर तालुक्यातील राजापूर, पिंप्री लौकी, आजमपूर, शेवगावमधील वडुले बु. या गावांतमध्ये लॉकडाउनचा आदेश देण्यात आला आहे.

वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं विधान

नगरमध्ये वाढत असेलल्या रुग्णसंख्येने राज्याचे लक्ष वेधून घेतलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यात लक्ष घालून उपाय करण्याच्या सूचना केल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन आढावा घेतला. त्यानंतर गावे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिले दोन दिवस बहुतांश गावांतील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी ऐन नवरात्रात घेण्यात आलेल्या निर्णयाला विरोधही सुरू झाला आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी आणि निघोज येथे व्यापाऱ्यांनी याला विरोध करीत आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढली. सणासुदीच्या दिवसांत या निर्णयामुळे ग्रामस्थ आणि दुकानदारांचेही नुकसान होणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. संगमनेर तालुक्यातूनही याला विरोध होत आहे. अश्वी येथील ग्रामस्थांनी खासदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली. गावात दहा रुग्ण आढळून आले की लॉकडाउन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे मोठ्या गावांवर अन्याय होत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत किती टक्के रुग्ण आहेत, हा निकष लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाचा: कोल्हापुरात खळबळ! हळदकुंकू लावलेल्या अवस्थेत आढळला बालकाचा मृतदेह

Source link

AhmednagarCorona Cases in AhmednagarLockdown in 69 Villages of Ahmednagarअहमदनगरकरोना
Comments (0)
Add Comment