आयफोन 15 प्रो मॅक्स पेक्षा शक्तिशाली फोनच्या कॅमेऱ्याची माहिती झाली लीक, जाणून घ्या कधी होईल लाँच

iPhone 16 सीरीजच्या लाँचची चर्चा गेले अनेक दिवस सुरु आहे. या लाइनअपमध्ये येणाऱ्या मोबाइल फोन्सचे लीक्स व रिपोर्ट्स समोर आले आहेत. त्यातून स्पेसिफिकेशन आणि डिजाइनची माहिती मिळाली आहे. यात आता आणखी एका रिपोर्टची भर पडली आहे. आगामी अपकमिंग सीरीजच्या टॉप मॉडेल म्हणजे iPhone 16 Pro Max च्या कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे, परंतु इतर फीचर्स, किंमत किंवा लाँच संबंधित माहिती मिळाली नाही.

48MP चा कॅमेरा मिळेल

गॅजेट 360 च्या एका रिपोर्टनुसार, iPhone 16 Pro Max 48MP Sony IMX903 मेन सेन्सरसह येईल, जो सध्या आयफोन 15 प्रो मॉडेलमध्ये मिळणाऱ्या लेन्सचा अपग्रेडेड व्हर्जन आहे. त्याचबरोबर यात 5x झूम देखील दिला जाईल.

असे असू शकतात इतर स्पेसिफिकेशन

अलीकडेच आलेल्या रिपोर्ट्स व लीक्सनुसार, आयफोन 16 प्रो मॅक्स मध्ये 4,676mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 30 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकते. यात A18 Pro प्रो चिप मिळेल. इतकेच नव्हे तर फोनमध्ये मोठा सुपर रेटिना डिस्प्ले देखील दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच, हा फोन ब्लॅक, व्हाइट या सिल्व्हर, ग्रे आणि रोज शेड कलरमध्ये उपलब्ध होईल.

कधी होईल लाँच

Appleनं अजूनतरी iPhone 16 सीरीजच्या लाँच बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. परंतु याआधी आलेल्या लीक्सनुसार, ही स्मार्टफोन सीरीज सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लाँच केली जाईल. याची किंमत 1 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

iPhone 15 Pro Max

आयफोन 15 प्रो मॅक्स गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये लाँच करण्यात आला होता. हा सीरिजमधील सर्वात महाग आयफोन आहे. याची किंमत 1,59,900 रुपये आहे. या फोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. याची स्क्रीन प्रो-मोशन आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर्ससह येते. याच्या बॉडीमध्ये टायटेनियमचा वापर करण्यात आला आहे. यात अ‍ॅक्शन बटन मिळतो. फास्ट फंक्शनिंगसाठी फोनमध्ये A17 Pro चिप देण्यात आली आहे.

आयफोन 15 प्रो मॅक्स मध्ये 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 10एक्स ऑप्टिकल झूम देण्यात आला आहे. यात क्रॅश डिटेक्शन सारखे फीचर्स मिळतात. या फोनमध्ये 29 तास चालणारी बॅटरी देण्यात आली आहे.

Source link

appleiPhoneiphone 16iPhone 16 Pro Maxअ‍ॅप्पलअ‍ॅप्पल आयफोनअ‍ॅप्पल आयफोन १६ प्रो मॅक्स
Comments (0)
Add Comment