28 मेला लाँच होईल दमदार प्रोसेसर असलेला रियलमी फोन, डिजाइन देखील असेल शानदार

Realme भारतात बॅक टू बॅक फोन लाँच करून वेगानं आपला पोर्टफोलियो वाढवत आहे. आता कंपनी नारजो सीरीजचा एक नवीन फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. रियलमी नारजो सीरीज आपल्या फीचर्स आणि डिजाइनसाठी लोकप्रिय आहे. कंपनी आता नारजो सीरीजमध्ये नवीन Realme Narzo N65 5G घेऊन येत आहे. आगामी रियलमी फोनमध्ये काय असेल आणि कधी लाँच केला जाईल, चला जाणून घेऊया.

Realme Narzo N65 5G ची लाँच डेट

कंपनीनुसार, आगामी Realme Narzo N65 5G 28 मेला भारतीय बाजरात लाँच केला जाईल. हा पहिला फोन असेल ज्यात डायमेन्सिटी 6300 5G चिपसेटचा वापर केला जाईल. त्याचबरोबर यात IP54 वॉटर रेजिस्टन्स मिळेल. यातील रेनवॉटर स्मार्ट टच फिचर ओल्या हाताने देखील फोन वापरण्यास मदत करेल.

अलीकडेच आलेला Realme GT 6T

रियलमी जीटी 6टी स्मार्टफोन 6.78 इंचाच्या LTPO डिस्प्लेसह लाँच आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी Snapdragon 7+ Gen 3 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक आहे.

मोबाइल अँड्रॉइड 14 वर चालतो.कंपनीनं रियलमी जीटी 6टी मध्ये 50MP चा मुख्य रियर कॅमेरा आणि 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. फ्रंटला 32MP चा सेन्सर देण्यात आला आहे. यातील 5500mAh ची बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी जीटी 6टी ची किंमत 24,999 रुपयांपासून सुरु होते, ही फोनच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. तर 8GB RAM व 256GB स्टोरेजसाठी 26,999 रुपये मोजावे लागतील. तर टॉप व्हेरिएंट 12GB RAM व 512GB स्टोरेजसह 33,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन कंपनीच्या वेबसाइटसह Amazon India वर 29 मे पासून उपलब्ध होईल.

Source link

realme narzo n65 5grealme narzo n65 5g india launchrealme narzo n65 5g launch daterealme narzo n65 5g priceरियलमीरियलमी फोनस्वस्त फोन
Comments (0)
Add Comment