Shukarvarche Upay
हिंदू धर्मात शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी उपवास करुन लक्ष्मी देवीची पूजा केल्याने लोकांचे संकट दूर होऊन आर्थिक स्थिती सुधारते. शुक्रवारी काही उपाय केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होते. ज्यामुळे आर्थिक चणचण कमी होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी देवी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. लक्ष्मी देवीला संपत्ती, शांती आणि समृद्धीची देवी मानली जाते. ती कमळाच्या आसनावर विराजनमान आहे. लक्ष्मी देवी ही सौंदर्याची देवी असून ज्या ठिकाणी स्वच्छता, कठोर परिश्रम आणि सुव्यवस्थेचे वातावरण असते त्या ठिकाणी तिचा वास असतो असे म्हटले जाते.
लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे जाणून घेऊया
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीला मोगरे अत्तर अर्पण केल्याने अनेक त्रासापासून सुटका होते. मोगरा आणि अत्तर लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे. हे अत्तर धनदेवतेला अर्पण केल्याने माता प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. हा उपाय केल्याने करिअरमध्ये प्रगती होते. घरात सुख-शांती राहते आणि धन-धान्याची कमतरता दूर होते.
ज्योतिषशास्त्रांच्या मते विवाहितांनी शुक्रवारी लक्ष्मी देवीला सोळा श्रृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील. तसेच जीवन आनंदाने भरते. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने शुभ फले मिळतात.
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शुक्रवारी घराच्या मुख्य दाराला गोमती चक्र बांधावे. यामुळे घरातील गरिबी दूर होते. तसेच जर तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर असेल तर त्याला अधिक बलवान बनवण्यासाठी रामायणातील लंकाकांडचे पठण करा.
सौभाग्य वाढवायचे असेल तर एक रुपयाचे नाणे घेऊन मंदिरात देवी लक्ष्मीसमोर ठेवा. देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करुन नाण्याची पूजा विधीवत करुन मंदिरात ठेवा. दुसऱ्या दिवशी ते नाणे उचलून लाल कपड्यात बांधून ठेवा. हे उपाय केल्याने तुमचे सौभाग्य वाढेल.
शुक्रवारी देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करताना गुलाबाचे अत्तर किंवा कवड्याचे अत्तर अर्पण करावे. असे केल्याने लोकांना मानसिक समस्यांपासून आराम मिळेल. तसेच लक्ष्मी देवीला चंदनाचे अत्तर अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. व्यवसायातही वाढ होते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.