Fact Check : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर चप्पल फेक? व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ जवळ येत असताना सोशल मीडियावर राजकारणी लोकांचे अनेक फेक आणि जुने व्हिडिओ आताचे असल्याचा दावा करत शेअर केले जात आहेत. नुकतंच सोशल मीडियावर केंद्र सरकारमधील मंत्री मनसुख मांडविया यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्यावर एक व्यक्ती चप्पल फेकताना दिसतो आहे. युजर्सकडून हा व्हिडिओ आताचा असल्याचं म्हणत शेअर केला जात आहे. परंतु ज्यावेळी न्यूज चेकर टीमने या १० सेकंदाच्या व्हिडिओची तपासणी केली त्यावेळी हा व्हिडिओ आताचा नसून ७ वर्षे जुना असल्याचं समोर आलं आहे.
Fact Check : नेपाळच्या संसदेतून पंतप्रधान मोदींवर टीका? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दावा केला?
सोशल मीडियावर समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अर्थात ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया एका मंचावर उभे राहून भाषण करताना दिसत आहेत. त्यावेळी तेथील उपस्थितांमधून एक तरुण येतो आणि ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देतो आणि त्याची चप्पल काढून मांडविया यांच्यावर फेकतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक त्या तरुणाला पकडतात. हाच व्हिडिओ शेअर करत आयपी सिंह यांनी लिहिलंय, की केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर चप्पल फेकली गेली. ते गुजरातमधील पशु प्रजनन केंद्रात पशुवैद्यकाचे सहाय्यक होते, मोदींनी त्यांना देशाचे आरोग्यमंत्री केले. हा व्हिडिओ अनेक इतर वेरिफाइड X अकाऊंटनेही शेअर केला आहे. (संग्रहित इथे पाहा)
Fact Check: कंगना रणौतसोबत फोटोत दिसणारी व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम? काय आहे सत्य
पडताळणीत काय समोर आलं?
न्यूज चेकरच्या टीमने या व्हिडिओची पडताळणी करताना व्हिडिओच्या फ्रेमच्या मदतीने फोटो गुगलवर सर्च केला गेला. या सर्चमध्ये त्यांना NDTV इंडियाच्या वेबसाइटवर २९ मे २०१७ रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट आढळला. या रिपोर्टमध्ये आता व्हायरल होणारा व्हिडिओ आहे.

NDTV च्या रिपोर्टनुसार, २८ मे २०१७ रोजी पाटीदार अनामत आंदोलन समितीशी संबंधित कार्यकर्ता भावेश सोनाणीने केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर चप्पल फेकली होती. या घटनेनंतर त्या तरुणाला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Fact Check: भारताचे दोन तुकडे व्हावेत, अमित शाह यांच्या दाव्याचा व्हिडिओ व्हायरल, सत्य काय?
न्यूज चेकरच्या टीमला या व्हिडिओची पडताळणी करताना एबीपी लाइव्हच्या वेबसाइटवर २९ मे २०१७ रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट आढळला. एबीपीच्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, २८ मे २०१७ रोजी भावेश नावाच्या व्यक्तीने एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर चप्पल फेकली होती. मात्र, चप्पल स्टेजवर न पडता खाली पडली होती.

याशिवाय नवभारत टाईम्स या वेबसाईटवर भाषेसंबंधीत रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला होता. ज्यात या घटनेचाही उल्लेख करण्यात आला होता.

एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या विचार पुढे घेऊन जातोय; मोदींकडून कौतुक

निष्कर्ष
न्यूजमेकर या वेबसाइटच्या तपासणीत हा व्हिडिओ सात वर्षे जुना असल्याचं सिद्ध झालं आहे. आता काही दिवसांत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर चप्पल फेकलेली नाही. निवडणुकीमुळे संभ्रम पसरवण्यासाठी हा जुना व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(This story was originally published by News checker, and republished by MT as part of the Shakti Collective.)



Source link

fact check mansukh mandaviya videofact check newsshoe throw at mansukh mandaviya viral videounion minister mansukh mandaviya viral videoकेंद्रीय मंत्री मनसुख मांडविया चप्पल फेक व्हिडिओफॅक्ट चेकफॅक्ट चेक मनसुख मांडविया
Comments (0)
Add Comment