मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की वनप्लस लवकरच सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन सादर करू शकते. एक्स युजर OneNormalUsername म्हटलं आहे की Android 15 Beta च्या लेटेस्ट रिलीजमध्ये दिसलेल्या वनप्लस 12 फोनच्या सेटिंग्स अॅपच्या एका भागात लिहिण्यात आले आहे- ‘Satellite mobile phone’.
अशीच काहीशी माहिती Oppo Find N3 मधून पण मिळाली होती. या सेटिंग्स अॅपमध्ये देखील सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा उल्लेख होता. हा उल्लेख एक कोड स्वरूपात होता. OnePlus 12 आणि Oppo Find N3 वर मिलेल्या कोड मध्ये फक्त कंपनीच्या नावाचा फरक आहे. ‘सॅटेलाइट मोबाइल फोन’ असा शब्दप्रयोग दोन्ही कोडमध्ये दिसतो, ज्यावरून अशी माहिती मिळते की या स्मार्टफोन्सचे फ्यूचर व्हर्जन सॅटेलाइट कम्युनिकेशनला सपोर्ट करू शकतात.
वनप्लसनं मात्र अजूनतरी OnePlus 12 च्या अश्या कोणत्याही व्हेरिएंटची घोषणा केली नाही जो सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. जर ही बातमी खरी ठरली तर यावर्षीच्या अखेरपर्यंत असा व्हेरिएंट लाँच होण्याची शक्यता आहे. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी असलेला हँडसेट चीनच्या बाहेर देखील लाँच केला जाऊ शकतो. सध्या चीनच्या बाहेर कोणताही अँड्रॉइड स्मार्टफोन सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करत नाही.
लेटेस्ट अँड्रॉइड 15 रिलीजच्या माध्यमातून Google नं कन्फर्म केलं आहे की नवीन अँड्रॉइड सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतील. यामुळे त्या युजर्सचा फायदा होईल जे लोकल नेटवर्क रेंजच्या बाहेर असतात. त्यांना नेटवर्क नसलेल्या ठिकाणी देखील सॅटेलाइटच्या मदतीनं SMS मिळतील आणि पाठवता येतील. Oppo Find X7 Ultra सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसह चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे.