५ महिन्यांपूर्वी दोघांना चिरडलं, मग आणखी चौघांवर कार चढवली; पुण्यानंतर ‘ते’ प्रकरण चर्चेत

Kanpur News, लखनऊ: पुण्यातील पोर्श अपघातानंतर आता उत्तर प्रदेशच्या कानपूरचे पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका अल्पवयीन मुलानं दोन मुलांना चिरडलं होतं. मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताचा तपास सुरु झाला. पण अल्पवयीन आरोपीला सोडून देण्यात आलं. गेल्या महिन्यात त्यानं पुन्हा एक अपघात केला. त्यात चार जणांना चिरडलं. पुण्यातील अपघाताचं प्रकरण देशभरात गाजल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

१५ वर्षीय मुलाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या वर्षी दोन मुलांचा मृत्यू झाला होता. पण त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता बुधवारी त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. दोन्ही अपघातांमध्ये एफआयआर दाखल झालेला होता. पण बुधवारपर्यंत आरोपीला अटक झालेली नव्हती.
Pune Porsche Accident: पुण्यात अपघात, प्रकरण गाजलं देशभरात; NCPचा आमदार संशयाच्या भोवऱ्यात, पण अजितदादा आहेत कुठे?
पुण्याच्या प्रकरणाची देशभर चर्चा झाल्यानंतर कानपूर पोलीस सक्रिय झाले. त्यांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली. आरोपीच्या वडिलांविरोधात दोन्ही अपघातांप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ते कानपूरमधील प्रख्यात डॉक्टर आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
Pune Car Accident: अडीच कोटींची पोर्शे कार अन् ८०० रुपयांचा फोन; कोण विश्वास ठेवेल? कोर्टात काय घडलं?
अपघाताची पहिली घटना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घडली. त्यावेळी अल्पवयीन आरोपी त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांसह कार चालवत होता. त्यानं कार एका न्यूडल्सच्या दुकानात घुसवली. त्यात सागर निशाद आणि आशिष राम चरण नावाच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या ३०४ ए प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

पाच महिन्यांनंतर म्हणजेच ३१ मार्च २०२४ रोजी अल्पवयीन आरोपीनं पुन्हा एकदा अपघात केला. त्यानं चार जणांचा चिरडलं. त्यात दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम २७९ आणि ३३८ च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पण कोणालाही अटक झाली नाही.

Source link

kanpurpune car accidentpune porsche tragedyपुणे कार अपघातपुणे पोर्शे अपघात
Comments (0)
Add Comment