आता केवळ WhatsAppद्वारे तपास ट्रेनचे पीएनआर स्टेटस; Railofy ने केले काम सोपे

PNR स्टेटस तपासण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना IRCTC WhatsApp आधारित सेवा पुरवते. ही WhatsApp आधारित सेवा भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी मुंबईस्थित एका स्टार्टअपने ऑफर केली आहे. हि सर्व्हिस कसे काम करते याची माहिती घेऊया.

युजर्सशी कनेक्ट होण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर

मेटाचे लोकप्रिय चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप केवळ चॅटिंगसाठीच नाही तर इतर अनेक कामांसाठी वापरले जात आहे. व्हॉट्सॲपचा युजर बेस मोठा आहे.प्रत्येक दुसऱ्या स्मार्टफोन युजरच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप आहे. यामुळेच अनेक कंपन्यांनी आपल्या युजर्सशी कनेक्ट होण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर सुरू केला आहे.तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर पीएनआर स्टेटस चेक करण्याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या फोनमध्ये असलेले व्हॉट्सॲप वापरून हे काम करू शकता.

Rodeo Travel Technologies ची सर्व्हिस

PNR स्टेट्स तपासण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना IRCTC WhatsApp आधारित सेवा पुरवते.
मुंबई स्थित स्टार्टअप Railofy (Rodeo Travel Technologies) भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही WhatsApp आधारित सेवा देते.या सुविधेमुळे, ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी त्यांच्या ट्रेनची स्थिती केवळ एका टॅपने ट्रॅक करू शकतात. म्हणजेच तुम्हाला कोणतेही वेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. Railofy हा IRCTC चा अधिकृत प्रीमियम पार्टनर आहे.

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे मिळतील डिटेल्स

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे प्रवाशांना पीएनआर स्टेटस, ट्रेनची थेट स्थिती, मागील रेल्वे स्थानकाची माहिती, आगामी स्थानकाची माहिती आणि रेल्वे प्रवासाशी संबंधित माहिती मिळू शकते.

कसे तपासायचे WhatsApp वर ट्रेनचे PNR स्टेटस

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Railofy चा WhatsApp चॅटबॉट नंबर 9881193322 फोनमध्ये सेव्ह करावा लागेल.
  • आता तुम्हाला व्हॉट्सॲप ओपन करावे लागेल.
  • तुम्हाला Railofy च्या WhatsApp चॅटबॉट नंबरसह चॅट पेजला भेट द्यावी लागेल.
  • आता तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर नंबर टाइप करून पाठवावा लागेल.
  • मेसेज पाठवल्यानंतर आणि व्हॅलिड पीएनआर नंबर मिळाल्यानंतर, तुम्हाला उत्तरामध्ये सर्व तपशील मिळतील.

Source link

pnr statusrailofyWhatsAppपीएनआर स्टेटसरेलोफायव्हॉट्सॲप
Comments (0)
Add Comment