भाजपने उत्तर प्रदेशला मुख्तार अन्सारीपासून मुक्ती दिली! अमित शाह यांच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील माफिया मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अमित शाह असं म्हणताना दाखवण्यात आलंय, की भाजपने यूपीला मुख्तार अन्सारीपासून मुक्त केलं आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता या व्हिडिओचं सत्य समोर आलं आहे. काय आहे सत्य?

काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा अमित शाहांचा व्हिडिओ ५७ सेकंदाचा आहे. या व्हिडिओमध्ये अमित शाह असं बोलताना दाखवण्यात आलं आहे, की सर्वात मोठं काम आम्ही केलं आहे. आम्ही तुम्हाला निजामपासून मुक्त केलं आहे. निजाममध्ये (NIZAAM) N चा अर्थ नसीमुद्दीन सिद्दीकीपासून भाजपने मुक्ती मिळवून दिली आहे. I चा अर्थ इमरान मसूदपासून भारतीय जनता पक्षाने मुक्ती दिली, आजम खानपासून मुक्ती भाजपने मिळवून दिली, अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारीपासून मुक्ती भाजपने मिळवून दिली आहे. जर सपा-बसपा युती झाली, तर उत्तर प्रदेशात पुन्हा (NIZAAM) चं सरकार येईल.

सोशल मीडियावर काय केला जातोय दावा?
अमित शाह यांचा व्हिडिओ व्हायरल करुन असा दावा केला जात आहे, की हा व्हिडिओ आताच आहे. हा व्हिडिओ एका वेरिफाइड एक्स अकाऊंटवरुन शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘अमित शाह सांगत आहेत, की मुख्तार अन्सारीपासून मुक्ती भारतीय जनता पक्षाने मिळवून दिली आहे. शाह यांनी अन्सारीला स्वतःच्या हाताने विष दिलं असं वाटत नाही का?’

Fact Check: इंडिया आघाडीच्या सभेतील गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, मात्र तपासात वेगळंच सत्य समोर, वाचा सविस्तर
काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य?
व्हायरल व्हिडिओमध्ये केला जाणारा दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ आताचा नसून २०१९ चा आहेत. व्हिडिओचा तपास करताना गुगलच्या मदतीने कीवर्ड सर्च करण्यात आले, त्यावेळी यूट्यूबवर १० एप्रिल २०१९ चा एक व्हिडिओ मिळाला, जो भाजपच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तोच आहे, जो सध्या चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

यूट्यूबवर आढळलेल्या या व्हिडिओला दिलेल्या डिस्क्रिप्शननुसार, माजी भाजप अध्यक्ष अतिम शाह यांनी उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये आयोजित सभेत असं विझान दिलं होतं आणि भाजपने यूपीला निजाममधून मुक्ती दिल्याचं म्हटलं होतं. निजाम याचा अर्थ नसीमुद्दीन सिद्दीकी, इमरान मसूद, आजम खान, अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारी असा होता.

संपूर्ण व्हिडिओचा तपास करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच्या सभेतील असल्याचं समोर आलं. उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये १० एप्रिल २०१९ रोजी निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी अमित शाह पोहोचले होते. ही सभा भाजप उमेदवार राजवीर सिंह यांच्या समर्थनार्थ झाली होती. हा संपूर्ण व्हिडिओ भाजपच्या अधिकृत यूट्यूब अकाऊंटवर उपलब्ध आहे, ज्यात १०व्या मिनिटात हा व्हायरल भाग आहे.

(This story was originally published by newschecker, and republished by MT as part of the Shakti Collective.)



Source link

amit shahamit shah speech mukhtar ansari videofact check newsअमित शाहअमित शाह मुख्तार अन्सारी भाषण व्हिडिओफॅक्ट चेक
Comments (0)
Add Comment