Fact Check: भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला, सोशल मीडियावरील व्हायरल VIDEO मागचं सत्य काय?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, भाजपच्या प्रचार गाडीवर लोकांनी हल्ला केला आणि गाडीला परिसरातून बाहेर हाकलून लावलं. भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये जमाव प्रचार वाहनाची तोडफोड आणि त्यावर दगडफेक करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. दावा केला जात आहे की भाजपच्या प्रचार वाहनावर नागरिकांनी हल्ला करुन त्याला पळवून लावलं.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका युझरने हा व्हिडिओ शेअर केला. ‘भाजपचं स्वागत सुरु झालं आहे, ४०० पार हा शब्द ऐकल्यासारखा वाटत आहे…’, असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे. या पोस्टला आतापर्यंत २८,००० हून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. भाजपच्या प्रचार वाहनावरील हल्ल्याचा जुना व्हिडिओ लोकसभा निवडणूक २०२४ चा असल्याचं सांगत व्हायरल केला जात आहे. वेबसाइट Logical Facts ने केलेल्या तपासात असं दिसून आलं की हा व्हिडिओ नोव्हेंबर २०२२ चा आहे. जेव्हा तेलंगणा यथे पोटनिवडणुकीदरम्यान कथित टीआरएस कार्यकर्त्याने भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केला होता. (येथे वाचा)

वेबसाइट Logical Facts च्या तपासात असं दिसून आलं की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रचार वाहनावर तेलुगू भाषेत लिहिण्यात आलं आहे. वाहनावर हल्ला करणारे लोक गुलाबी रंगाचे झेंडे घेऊन आणि गुलाबी स्कार्फ आणि टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे तेलुगू ही अधिकृत भाषा आहे. गुलाबी रंग हा तेलंगणाचा मुख्य विरोधी पक्ष, भारत राष्ट्र समिती [BRS, पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS)] च्या ध्वजाचा अधिकृत रंग आहे. संबंधित कीवर्डद्वारे शोधले असता, यूट्यूबवर असे अनेक व्हिडिओ आढळले.

असाच एक व्हिडिओ न्यूज रिपोर्ट इंडिया टुडेने २ नोव्हेंबर २०२२ रोजी पोस्ट केला होता. ज्याचे शीर्षक होते, ‘मुनुगोडे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि टीआरएस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी’. या व्हिडिओमध्ये तशीच दृश्य दिसत आहेत जी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. यापूर्वी एप्रिल २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यानही हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळीही लोक भाजपच्या प्रचाराच्या वाहनावर दगडफेक करून त्याला परतवून लावत असल्याचा दावा करण्यात आला होता.

निष्कर्ष

Logical Facts वेबसाइटच्या तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की तेलंगणात २०२२ मध्ये भाजप आणि टीआरएस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या कथित संघर्षाला लोकसभा २०२४ च्या निवडणुकीशी जोडून व्हायरल केले जात आहे की नागरिक भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला करत आहेत. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओचा दावा खोटा आहे (येथे वाचा).

(This story was originally published by Vishwas News, and republished by NBT as part of the Shakti Collective.)

Source link

Bjp Campaign Vehicle Attacked Fact Checkbjp campaign vehicle attacked fake newsBJP Viral Video Fact Check Newsfact checkFact Check BJP Newsfact check newsFact Check News In Marathifake newsलोकसभा निवडणूक २०२४व्हायरल न्यूज
Comments (0)
Add Comment